Share Market Tips : गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. भूराजकीय तणावांमुळे शेअर मार्केट अस्थिर बनलाय आणि गुंतवणूकदार देखील भीतीच्या छायेत आहेत. पण शेअर मार्केट मधील या अस्थिरतेच्या काळात सुद्धा काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत आहेत. आमचं नेहमीच अशा कंपन्यांकडे लक्ष असतं.
दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशा एका कंपनी बाबत माहिती सांगणार आहोत जी की प्रॉपर पुण्याची आहे आणि तिला मुंबईत एक मोठी ऑर्डर मिळाली. या ऑर्डर मुळे या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा रॉकेट तेजीत आले आहेत. ईपीसी (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) आणि रिअल इस्टेट कंपनी Vascon Engineers Ltd या कंपनीला अलीकडेच 161 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

या ऑर्डर मुळे या कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. कंपनीने स्टॉक एक्सचेंज ला दिलेल्या माहितीनुसार तिला एमएसईबी होल्डिंग कंपनीकडून मुंबईत पुनर्विकासाचे काम मिळाले आहे. महालक्ष्मी येथे असलेल्या सौदामिनी इमारतीच्या संपूर्ण रीडेव्हलपमेंटचे काम पुण्याच्या या कंपनीच्या हाती लागल्यानंतर लगेचच याचे स्टॉक रॉकेट तेजीत आलेत.
वास्कॉन इंजिनियर्स लिमिटेडला जे काम मिळाले आहे त्याचे एकूण मूल्य 161.18 कोटी रुपये आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी या शेअरची खरेदी वाढवली आहे. पण शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या या कंपनीची गेल्या पाच वर्षातील मार्केटमधील स्थिती कशी राहिली आहे? याबाबत आता आपण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.
कंपनीची शेअर मार्केट मधील कामगिरी
वास्कॉन इंजिनियर्स लिमिटेडला मिळालेला मुंबईतील रीडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट जीएसटी व विमा वगळता 161.18 कोटी रुपयांचा आहे. अर्थात हा एक बडा प्रोजेक्ट आहे आणि यामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेत वृद्धी होणार आहे. या नव्या कॉन्ट्रॅक्ट मुळे कंपनीचे ऑर्डर बुक मजबूत बनली आहे.
जून 2025 अखेरपर्यंत कंपनीचे ऑर्डर बुकचे एकूण मूल्य 2902 कोटी रुपये होते. कंपनीच्या ईपीसी महसूलच्या तिप्पट त्याच्या ऑर्डरबुकचे मूल्य आहे. या कंपनीने अलीकडेच अदानी इन्फ्रा सोबत सुद्धा सामंजस्य करार केला आहे. साहजिकच याचाही कंपनीला मोठा फायदा होतो आणि या क्षेत्रात त्यांची पकड आणखी घट्ट झाली आहे.
कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 30 दिवसांच्या काळात 27.4% ची वाढ झाली आहे. सध्या हा शेअर 67 रुपयांवर ट्रेड करतोय. गेल्या सहा महिन्यात या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 87 टक्क्यांचे रिटर्न मिळाले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे शॉर्ट टर्म प्रमाणेच लॉंग टर्म मध्ये देखील कंपनीचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरला आहे. पाच वर्षाच्या काळात कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.