Share Market Today : अखेर व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी शेयर मार्केटची घसरण थांबली, सेन्सेक्स अन निफ्टीमध्ये मोठी वाढ! कारण काय?

Published on -

Share Market News : गुरुवारी सलग सातव्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. काल 13 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये काल घसरण पाहायला मिळाली.

पण आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थातच व्हॅलेंटाइन डेला भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स 250 अंकांनी वधारून 76,388 वर तर एनएसई निफ्टी 65 अंकांच्या वाढीसह 23,096 च्या पातळीवर उघडला. ग्लोबल मार्केटमधील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय बाजारात तेजी दिसून आली असल्याचे मत बाजारातील अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

भारतीय शेअर बाजाराची स्थिती कशी आहे ?
जागतिक बाजारात झालेल्या सकारात्मक हालचालींमुळे आज व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. काल, गुरुवारी सलग सातव्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला होता. सेंसेक्स 32.11 अंकांनी घसरून 76,138.97 वर बंद झाला अन निफ्टी 50 देखील 13.85 अंकांनी कमी होऊन 23,031.40 वर बंद झाली.

आशियाई बाजारांची स्थिती कशी आहे?
जपानचा निक्केई 225 – 0.15% घसरला
टॉपिक्स इंडेक्स – 0.31% वाढ
दक्षिण कोरियाचा कोस्पी – 0.14% वाढ
कोस्डॅक – 0.74% वाढ
हॉंगकॉंगच्या हॅंग सेंग इंडेक्स फ्युचर्समध्ये वाढ दिसून आली.

निफ्टीची आजची स्थिती कशी आहे ?
गिफ्ट निफ्टी 23,195 च्या स्तरावर व्यवहार करत होता. निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावाच्या तुलनेत 87 अंकांचा प्रीमियम असल्याने भारतीय बाजारासाठी सकारात्मक संकेत मिळाले.

अमेरिकन शेअर बाजारात तेजी आली !
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार भागीदारांवर टॅरिफ लावण्याचा रोडमॅप जाहीर केल्यानंतर वॉल स्ट्रीट वधारला.
डाऊ जोन्स – 0.77% वाढून 44,711.43 वर बंद झाला.
एसअँडपी 500 – 1.04% वाढून 6,115.07 वर बंद झाला.
नॅस्डॅक – 1.50% वाढून 19,945.64 वर बंद झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe