Share Market Update : ‘हे’ आहेत मुकेश अंबानींचे स्वस्त शेअर्स, किंमत 50 रुपयांपेक्षाही कमी, मिळतोय झटपट प्रचंड नफा

Share Market Update :- मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी आहे. त्याचे मार्केट कॅप 15.55 लाख कोटी रुपये आहे.

जिओ फायनान्शिअल ऑगस्टमध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली होती. याची किंमत 1.50 कोटी रुपये आहे. तुम्हाला एक माहित आहे का मुकेश अंबानी अनेक छोट्या कंपन्यांचे देखील मालक आहेत के ज्यांचे शेअर्स 50 रुपयांपेक्षा कमी आहेत.

पण गुंतवणूकदारांना मालामाल करण्यात ते चांगल्या कंपन्यांना देखील मागे टाकतात. मुकेश अंबानी यांच्या या कोणत्या कंपन्या आहेत की ज्या गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून देत आहेत त्याविषयी माहिती घेऊ.

हॅथवे भवाली केबलटेल अँड डाटाकॉम लि.
कंपनीचे शेअर्स जवळपास १९ रुपयांवर व्यवहार करत आहेत. कंपनीने तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना सुमारे १६ टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीने गुंतवणूकदारांना ५०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

हॅथवे केबल आणि डेटाकॉम लिमिटेड
कंपनीने 6 महिन्यांत 48 टक्के परतावा दिला आहे. कंपनीने एका वर्षात 22 टक्के परतावा दिला आहे. चालू वर्षात, कंपनीने गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांपेक्षा जास्त उत्पन्न दिले आहे. तज्ज्ञांच्या मते कंपनी आगामी काळात चांगला परतावा देऊ शकते.

आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड
हा शेअर 19.35 रुपये ट्रेंड करत आहे. कंपनीने एका महिन्यात गुंतवणूकदारांना 2 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीने 63 टक्क्यांहून अधिक कमावून दिले आहेत. एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 22 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीने चालू वर्षात 23 टक्के परतावा दिला आहे.

टीव्ही 18 ब्रॉडकास्ट लिमिटेड
मुकेश अंबानी यांच्या या मीडिया कंपनीचा शेअर आज 46 रुपयांवर ट्रेड करत आहे. 6 महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांना 60.49 टक्के परतावा दिला आहे. चालू वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना सुमारे 23 टक्के परतावा दिला आहे. तर कंपनीचा परतावा पाच वर्षांत 25 टक्क्यांहून अधिक राहिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe