15 जानेवारीला शेअर मार्केट बंद राहणार का ? स्टॉक एक्सचेंजने दिली मोठी माहिती

Published on -

Share Market : महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. उद्या 15 जानेवारी रोजी राज्यात मतदान आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी देखील उद्या मतदान होईल.

म्हणून मतदानाच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट बद राहणार का? हा सवाल उपस्थित होत होता. आता याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा अनेक भागांमध्ये आधीच सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

राज्यातील 29 महापालिका कार्यक्षेत्रात राज्य शासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या राज्यातील अनेक सरकारी कार्यालय, बँका बंद राहणार आहेत.

शेअर मार्केट बंद राहणार ! 

उद्या शेअर मार्केट पूर्णपणे बंद राहणार अशी माहिती स्टॉक एक्सचेंजकडून देण्यात आली आहे. सुरुवातीला मार्केट अंशतः सुरू राहणार असे म्हटले जात होते.

सुरुवातीच्या टप्प्यात एनएसई आणि बीएसईकडून हा दिवस फक्त सेटलमेंट हॉलिडे असेल, ट्रेडिंग नेहमीप्रमाणे सुरूच राहणार अशी माहिती देण्यात आली होती.

पण नंतर एक सुधारित परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकानुसार उद्या 15 जानेवारी 2026 रोजी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्ण ट्रेडिंग हॉलिडे घोषित करण्यात आला आहे. अर्थात उद्या शेअर मार्केट पूर्णतः बंद राहणार आहे.

भांडवली बाजार, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज आणि व्याजदर डेरिव्हेटिव्ह्जसह सर्व विभागांना उद्या हॉलिडे जाहीर करण्यात आला आहे.

तसेच सिक्युरिटीज लेंडिंग आणि बोरोइंग (SLB) सुविधा पण उद्या बंद राहतील अशी माहिती देण्यात आली आहे. उद्या मुंबईत बँका सुद्धा बंद राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe