12 महिन्यात श्रीमंत व्हायचंय का ? ‘हे’ 4 शेअर्स एका वर्षात 51 टक्क्यांपर्यंत रिटर्न देणार, पहा यादी

Published on -

Share To Buy : तुम्हीही येत्या दिवाळीत शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्याच्या तयारीत आहात का ? मग आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची टीप सांगणार आहोत. खरे तर दसरा-दिवाळी अशा शुभ मुहूर्तावर अनेकजण सोन्यात आणि चांदीत इन्वेस्ट करतात. या शुभप्रसंगी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे दसऱ्याला तसेच दिवाळीला अनेकजण नवीन शुभ कार्याची सुरुवात करतात.

काहीजण या शुभमुहूर्तावर गुंतवणूक सुद्धा करतात. दरम्यान जर तुम्हालाही यंदाच्या दिवाळीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला असे 4 शेअर्स सांगणार आहोत ज्यातून तुम्ही येत्या एका वर्षात चांगला पैसा कमवू शकणार आहात.

आज आपण प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म शेअरखानने लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी सुचवलेल्या पाच शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. टॉप ब्रोकरेजने सुचवलेल्या या शेअर्समधून येत्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 51 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न भेटतील असा अंदाज दिला आहे. नक्कीच आता तुम्हाला या स्टॉक बाबत जाणून घ्यायचं असेल चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी डिटेल माहिती.

या स्टॉक मधून भेटणार 51 टक्क्यांपर्यंत रिटर्न

Arvind Smartspaces – तुम्हालाही पुढील बारा महिन्यांमध्ये शेअर मार्केट मधून चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही या स्टॉक मध्ये पैसा गुंतवायला हवा. टॉप ब्रोकरेजच्या मते येत्या बारा महिन्यात यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 51% पर्यंत रिटर्न मिळू शकतात. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 643 रुपये आहे मात्र भविष्यात या स्टॉक ची किंमत 973 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

 ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया – टॉप ब्रोकरेजने या शेअर्ससाठी बाय रेटिंग दिली आहे अर्थात हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 1209 रुपये आहे पण पुढील बारा महिन्यात या स्टॉक ची किंमत 1400 रुपयांपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज आहे. अर्थात यातून 16 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळू शकतात असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल – या शेअर्स साठी देखील बाय रेटिंग देण्यात आली आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 1252 एवढी आहे. पण यासाठी 1570 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात येत्या काळात या स्टॉक मध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

आरईसी लिमिटेड – या कंपनीच्या स्टॉक साठी देखील टॉप ब्रोकरेज कडून बाय रेटिंग मिळाली आहे. म्हणजे गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करावा असा सल्ला देण्यात आलाय. या स्टॉकची सीएमपी म्हणजेच करंट मार्केट प्राइस 378 आहे. पण या स्टॉक साठी 535 रुपयांचे टार्गेट प्राईस ठेवण्यात आलय. अर्थात येत्या एका वर्षात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 42% पर्यंत रिटर्न मिळू शकतात असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News