Dividend Stock:- सध्या शेअर मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून शेअर होल्डर्स करिता लाभांश म्हणजेच डिव्हिडंड जाहीर केले जात आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना म्हणजे शेअरहोल्डर्सला अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी प्राप्त होते. अगदी याचप्रमाणे देशातील सर्वात मोठी विज निर्मिती करणारी कंपनी महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील असलेल्या एनटीपीसी लिमिटेडच्या माध्यमातून आर्थिक वर्ष 2024-25 वर्षाकरिता अंतिम लाभांश म्हणजेच डिव्हिडंड जाहीर करण्यात आलेला आहे व त्याची रेकॉर्ड रेट देखील निश्चित करण्यात आलेली आहे.
किती मिळेल डिव्हिडंड?
मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मिती कंपनी असलेल्या एनटीपीसी लिमिटेडने आर्थिक वर्ष 2024-25 करिता अंतिम लाभांशासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केलेली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार बघितले तर 4 सप्टेंबर 2025 रोजी ज्या गुंतवणूकदारांकडे एनटीपीसीचे शेअर्स आहेत त्यांना या लाभांशाचा फायदा मिळणार आहे. यामध्ये शेअर होल्डर्सना प्रति शेअर 3.35 रुपये अंतिम लाभांश देण्यात येणार आहे व ही रक्कम दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर दिली जाणार आहे. भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर 25 सप्टेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर हा लाभांश दिला जाणार आहे.

एनटीपीसी लिमिटेडच्या शेअरचा परफॉर्मन्स कसा?
एनटीपीसी लिमिटेडचे मार्केट कॅप जर बघितले तर ते 29 ऑगस्ट 2025 रोजी साधारणपणे 3,20,911,17 कोटी रुपये इतके होते. 29 ऑगस्ट रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 0.69 टक्क्यांनी घसरला व 330.95 रुपयांवर बंद झाला. शुक्रवारी यामध्ये घसरण झाली व साधारणपणे 329.15 रुपयांवर व्यवहार करत होता. या शेअरची 52 आठवड्यातील उच्चांकी आणि निचांकी पातळी बघितली तर ती अनुक्रमे 448.30 व 292.70 रुपये इतकी आहे.