‘या’ डिजिटल पेमेंट कंपनीचे शेअर 698 वरून थेट 250 वर! गुंतवणूकदारांनी आता काय करावे?

Published on -

Mobikwik Share Price:- आज शेअर बाजारात मोबिक्विक या डिजिटल पेमेंट कंपनीने गुंतवणूकदारांची निराशा केली. गेल्या वर्षी मोठ्या गाजावाजात बाजारात दाखल झालेल्या या कंपनीचा शेअर आज तब्बल ७ टक्क्यांनी घसरला. दिवसअखेर मोबिक्विकचा शेअर ₹२५० च्या आसपास आला, जो त्याच्या आयपीओ किमतीपेक्षा जवळपास १० टक्क्यांनी कमी आहे.

ही घसरण अचानक वाटली तरी त्यामागचं कारण बाजारासाठी नवीन नाही. मोबिक्विकच्या काही गुंतवणूकदारांचा “लॉक-इन पीरियड” संपला आहे. म्हणजेच, आता ते शेअर्स विकू शकतात. आयपीओनंतर काही मोठ्या गुंतवणूकदारांना ठराविक काळ शेअर्स विकण्यास बंदी असते. तो काळ संपताच, मोठ्या प्रमाणात शेअर्स विक्रीसाठी बाजारात येतात आणि त्याचा परिणाम शेअरच्या किमतीवर होतो. नुवामा रिसर्चच्या अंदाजानुसार, सुमारे ३.८ कोटी शेअर्स विक्रीसाठी खुले झाले आहेत. याचा दबाव बाजारावर जाणवतो आहे.

मोबिक्विकच्या शेअर्सची सध्याची स्थिती

मोबिक्विकने शेअर बाजारात दमदार प्रवेश केला होता. आयपीओची किंमत ₹२७९ असूनही, लिस्टिंगच्या दिवशी हा शेअर जवळपास ₹७०० च्या उंचीवर गेला होता. पण नंतरची वाटचाल मात्र थोडी अडखळती झाली. लिस्टिंगनंतर मिळालेलं उंच शिखर काही काळासाठीच टिकून राहिलं आणि नंतर शेअर हळूहळू घसरत गेला. सध्या त्याच्या सर्वोच्च पातळीपासून सुमारे ६४ टक्के खाली आहे.

कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत बोलायचं झालं, तर नुकतेच जाहीर केलेल्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालात मोबिक्विकला ₹३.६ कोटींचं नुकसान झालं आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ₹५.३ कोटींचा नफा होता.म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत स्थिती काहीशी कमजोर दिसते. मात्र, यामध्ये एक सकारात्मक गोष्ट म्हणजे नुकत्याच संपलेल्या जून तिमाहीत कंपनीला ₹६.४ कोटींचा तोटा झाला होता, त्यामुळे सध्याचा तोटा तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे.

सध्या कंपनीचे उत्पन्न किती?

या सगळ्या गोंधळात एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कंपनीचं उत्पन्न वाढलं आहे. सप्टेंबर तिमाहीत मोबिक्विकचं महसूल ₹२९१ कोटींवर पोहोचलं,जे मागच्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ४३ टक्के जास्त आहे. मात्र, नफ्याच्या बाबतीत कंपनीचं ऑपरेटिंग नफा (EBITDA) घटून ₹६.८ कोटी झाला आहे, जे मागील वर्षी ₹१०.८ कोटी होतं. तरीही कंपनीनं मार्जिन वाढवून ५.२ टक्क्यांवर आणलं आहे, जे मागील वर्षी फक्त २.३ टक्क्यांवर होतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!