Multibagger Stocks : आज आपण अशा एका शेअरबद्दल बोलणार आहोत. ज्याने गेल्या काही काळापासून खूप चांगला परतावा दिला आहे. आम्ही सध्या MOIL Limited च्या शेअरबद्दल बोलत आहोत, मँगनीज उत्पादन आणि विक्रीमध्ये गुंतलेल्या या कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या ग्राहकांना जोरदार परतावा दिला आहे.
ही सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) कंपनी आहे. या कपंनीचे शेअर्स आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शुक्रवारी BSE वर इंट्राडे ट्रेड दरम्यान 19 टक्केच्या वाढीसह विक्रमी उच्चांकावर पोहोचले. कंपनीच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. या वाढीमागे आर्थिक वर्ष 2024 च्या मार्च तिमाहीतील कंपनीचे निकाल असल्याचे मानले जाते. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 19.99 टक्क्यांनी 87.40 रुपयांच्या वाढीसह 524.60 रुपयांवर बंद झाले.
चालू आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 12.6 टक्के ने वाढून 91 कोटी रुपये झाला आहे. तर गतवर्षी याच कालावधीत ते ८१ कोटी रुपये होते. त्याच वेळी, ऑपरेशन्समधील महसूल 2.8 टक्क्यांनी घसरून 416 कोटी रुपयांवर आला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 428 कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचे मार्जिन 30.8 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे जे केवळ एक वर्षापूर्वीच्या काळात 31 टक्के होते. कंपनीच्या भक्कम कामगिरीचे श्रेय तिची मजबूत विक्री आणि उत्पादन याबरोबरच धातूच्या वाढत्या किमतीलाही दिले जात आहे.
दुसरीकडे, कंपनीच्या बोर्ड मेंबर्सनी गुंतवणूकदारांना 10 चे दर्शनी मूल्याचे प्रति इक्विटी शेअर 2.55 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. मात्र, लाभांशाची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कंपनीने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 230.2 टक्केचा बंपर परतावा दिला आहे. MOIL लिमिटेड शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 524.60 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 151.50 रुपये आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनीचे मार्केट कॅप 10,674.83 कोटी रुपये आहे