CNG Price In Maharashtra : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्यांना वाढत्या महागाईमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. पगारदार लोकांचा पगार वाढत्या महागाईमुळे संसाराचा गाडा चालवण्यासाठी देखील अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे आता जगावे कसे हाच सवाल आहे. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत.
याशिवाय इतरही अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः बेजार झाले आहेत. दरम्यान, महागाईने होरपळलेल्या जनतेला आणखी एक जोर का झटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या राष्ट्रीय राजधानी अर्थातच दिल्लीत सीएनजी गॅस च्या किमती वाढल्या आहेत.

विशेष म्हणजे गेल्या तीन आठवड्यांचा विचार केला असता राजधानी दिल्लीत ही दरवाढ दुसरी ठरली आहे. दिल्लीसह NCR आणि उत्तर प्रदेश मधील गाजियाबादमध्ये देखील सीएनजीच्या दरात मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान आता आपण दिल्ली एनसीआर आणि गाझियाबाद मध्ये सीएनजीच्या किमती किती वाढले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात सीएनजीच्या किमती काय आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वाढलेत भाव
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली, एनसीआर आणि गाझियाबाद मध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो एक रुपयाची वाढ झाली आहे. या नव्याने लागू करण्यात आलेल्या दरवाढीमुळे आता राजधानी दिल्लीत 76.59 प्रति किलो या दरात सीएनजी मिळत आहे.
याशिवाय नोएडा आणि गाझिया शहरात सीएनजीचा भाव 82.20 रुपये प्रति किलो एवढा झाला आहे. विशेष म्हणजे सीएनजी च्या किमती वाढल्या असल्याने आता या संबंधित शहरांमधील कॅब, बस यांचे तिकीट दर देखील वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काय भावात मिळतय सीएनजी
देशाच्या राष्ट्रीय राजधानीत सीएनजीच्या किमती वाढल्यात मात्र आर्थिक राजधानी सीएनजीच्या किमती जशाच्या तशाच आहेत. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात सीएनजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
सध्या आर्थिक राजधानीत सीएनजीचा भाव प्रतिकिलो 76 रुपये एवढा आहे आणि पुण्यात प्रति किलो 88 रुपये या दराने सीएनजी उपलब्ध होत आहे. निश्चितचं महाराष्ट्रात सीएनजीच्या किमती कायम असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.