अरे वा! एकेकाळी भारतात श्रीरामचंद्र लक्ष्मण बँक होती? केव्हा अस्तित्वात होती भारतामध्ये ही बँक? जाणून घ्या माहिती

भारताला समृद्ध असा इतिहास लाभला आहे व गेल्या लाखो वर्षापासून भारताची संस्कृती टप्प्याटप्प्याने विकसित होत आली व इतर जागतिक संस्कृतीपेक्षा भारताची संस्कृती अनेक पैलूंनी वेगळी आहे व तितकीच वैशिष्ट्यपूर्ण अशी देखील आहे. भारतामधील हे वेगळेपण आपल्याला अनेक बाबतीत पाहायला मिळते. जसं ते सांस्कृतिक तसेच भौगोलिक दृष्ट्या आहे तसेच ते आर्थिकदृष्ट्या देखील आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:
ramchandra bank

Shriramchandra Laxman Bank:- भारताला समृद्ध असा इतिहास लाभला आहे व गेल्या लाखो वर्षापासून भारताची संस्कृती टप्प्याटप्प्याने विकसित होत आली व इतर जागतिक संस्कृतीपेक्षा भारताची संस्कृती अनेक पैलूंनी वेगळी आहे व तितकीच वैशिष्ट्यपूर्ण अशी देखील आहे. भारतामधील हे वेगळेपण आपल्याला अनेक बाबतीत पाहायला मिळते. जसं ते सांस्कृतिक तसेच भौगोलिक दृष्ट्या आहे तसेच ते आर्थिकदृष्ट्या देखील आहे.

आर्थिकदृष्ट्या पाहिले तरी आपल्याला अनेक वेगळेपण वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये दिसून येते. यामध्ये प्रत्येक संस्कृतीचे चलन म्हणजेच नाणे व चलनासाठीच्या पद्धती या वेगवेगळ्या होत्या.

अगदी या आर्थिक वैशिष्ट्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारतामध्ये खूपच कमी लोकांना माहिती असेल की,पूर्वी भगवान श्रीरामांच्या नावाने एक बँक होती व या बँकेच्या चेकमध्ये भगवान श्रीराम तसेच लक्ष्मण आणि सीता यांची छायाचित्रे आढळून आलेली आहेत

जर आपण भूतकाळातील इतिहासाची पाने चाळली तर आपल्याला कळते की, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक भागामध्ये राम हे उपस्थित होते. मग ते कुठलेही राज्य असो.

याबाबतीत डुंगरपुर संस्थानाची श्रीरामचंद्र लक्ष्मण बँक आपल्याला हीच बाब ठळकपणे स्पष्ट करते. राजे आणि सम्राटांच्या काळामध्ये ही बँक अस्तित्वात होती व ही बँक दीर्घकाळ कार्यरत राहिली.काही कालावधीनंतर ती इतर बँकांमध्ये विलीन करण्यात आली असे म्हटले जाते.

राजे-सम्राटांच्या कालावधीत होती श्री रामचंद्र लक्ष्मण बँक
श्रीरामचंद्र लक्ष्मण बँक ही राजे-सम्राटांच्या काळामध्ये अस्तित्वात होती व तिची स्थापना महारावल लक्ष्मण सिंग यांच्या राजवटीत झाली होती. ही बँक अनेक दशके अस्तित्वात होती व डुंगरपुरच्या शासकाच्या तोंडी आदेशानुसार तिची स्थापना झालेली होती.

ही बँक आणि या बँकेचे धनादेश हे भगवान श्रीरामाच्या नावाने चालत असत व त्यावरील आकर्षक डिझाईन्समध्ये श्रीरामांचे छायाचित्र होते. असे म्हटले जाते की, डुंगरपुर राज्याच्या या बँकेचे चेक लखनऊच्या एनके प्रेसमध्ये छापण्यात आले होते.

अनेक राजांची होती या बँकेत खाती
श्रीरामचंद्र लक्ष्मण बँक डुंगरपुर, राजस्थान येथे होती. 19 व्या शतकात जेव्हा राजे राज्य करत होते व त्यानंतर ही बँक सुरू झाली. विशेष म्हणजे या बँकेची कुठल्याही पद्धतीची लेखी स्वरूपातील घटना नव्हती व या बँकेने आपल्या काळात अनेक राज्यांची बँक खाते उघडली होती.

इतकेच नाहीतर जनतेचा देखील पैसा सुरक्षितपणे या बँकेत जमा केला जायचा. या बँकेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यावेळी देखील या बँकेने चेकबुक दिले होते व त्यांची रचना आजच्या चेकपेक्षा खूपच वेगळी आणि आकर्षक होती. कोटाचे चलन तज्ञ शैलेश जैन यांनी हा धनादेश जमा केला व हाच चेक सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

हा चेक श्रीरामचंद्र लक्ष्मण बँकेचा असून बँकेच्या नावात आणि लोगो मध्ये देखील भगवान श्रीरामांचे छायाचित्र आपल्याला यामध्ये दिसून येते.इतकेच नाहीतर 1604 मध्ये सम्राट अकबराच्या काळात सोने व चांदीची नाणी जारी करण्यात आली होती व त्यावर एका बाजूला भगवान राम हातात धनुष्य धरून आहेत आणि माता सीता हातात फुलं धरून आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe