चांदीच्या भावात होणार वाढ ; गुंतवणूकदारांची होणार चांदीच चांदी ! समोर आले हे कारण…

Published on -

७ मार्च २०२५ मुंबई : जास्त औद्योगिक मागणी आणि पुरवठा कमी असल्यामुळे २०२५ हे वर्ष चांदीसाठी खूप चांगले ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.पुढच्या १२ ते १८ महिन्यांमध्ये चांदीच्या किमती वाढू शकतात.चांदीच्या किमती वाढायला मध्यम ते दीर्घकालीन घटक कारणीभूत ठरत आहेत, असे एम. के. वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड वित्तीय संस्थेच्या अहवालात सांगितले आहे.

इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सर्किट बोर्ड, सौर पॅनेल आणि ईव्ही बॅटरीमध्ये चांदी हा एक महत्त्वाचा घटक असतो.औद्योगिक वापरात वाढ झाल्यामुळे चांदीची मागणी मजबूत आहे.इलेक्ट्रिक गाड्या आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा सतत अवलंब केल्यामुळे चांदीची औद्योगिक मागणी मजबूत राहिल अशी अपेक्षा आहे.चांदीच्या एकूण मागणी पैकी सुमारे ६० टक्के मागणी औद्योगिक क्षेत्रातून होत आहे.

मागील काही दिवसांपासून चांदीच्या किमती वाढल्या आहेत.२०२४ मध्ये भारतीय रुपयांमध्ये चांदीच्या किमती १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि २०२५ मध्ये आतापर्यंत ११ टक्क्यांनी वाढल्या आहेत. २०२४ मध्ये चांदीची एकूण मागणी १,२१९ दशलक्ष औंस असण्याचा अंदाज आहे, तर पुरवठा फक्त १,००४ दशलक्ष औंस होता. मागणी आणि पुरवठ्यात सतत फरक होत असल्यामुळे चांदीच्या किमती वाढत आहेत.

चांदी सध्या ३३ डॉलर प्रति औंसची महत्त्वाची पातळी राखत आहे आणि तांत्रिक निर्देशक असे दाखवत आहेत की, त्यात अजूनही वाढ होऊ शकते.त्यानुसार येत्या काळात चांदीची प्रति औंस किंमत ३६.६०, ३८.७० आणि ३९.३० डॉलर पर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe