गुंतवणूकदारांची झाली चांदी ! एका वर्षात 57% रिटर्न मिळालेत, चांदीच्या किमती आणखी किती रुपयांनी वाढणार ?

Published on -

Silver Rate : गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. गत अडीच दशकांच्या काळात सोन्याची किंमत 2600 टक्क्यांनी वाढली आहे. 2000 मध्ये सोन्याची किंमत 5 हजार रुपये प्रति तोळ्याच्या आत होती. महत्वाची बाब म्हणजे 2004 पर्यंत या किमती जवळपास स्थिर राहिल्यात.

पण पुढे 2008 मध्ये जागतिक मंदी आली आणि याचाच परिणाम म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढत गेली. सोन्याला सेफ हेवन असं म्हटलं जातं म्हणजे यात केलेली गुंतवणूक सहसा निगेटिव्ह रिटर्न तरी देणार नाही असा गुंतवणूकदारांचा ठाम विश्वास असतो.

दरम्यान सोन्यासारखेच रिटर्न चांदीने सुद्धा दिले आहेत. चांदीनेही गेल्या काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवल आहे. यावर्षी तर चांदीने सोन्यापेक्षा जास्त परतावा दिलेला आहे. यामुळे काही गुंतवणूकदार शेअर मार्केट ऐवजी सोन्यात आणि चांदीत गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवताना दिसतात.

दुसरीकडे ज्या कंपन्या चांदीचे उत्पादन करतात किंवा चांदीचे दागिने वगैरे बनवतात अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुद्धा येत्या काळात चांगली वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. काल संध्याकाळी चार वाजता चांदीचा भाव एक लाख 45 हजार 60 रुपये प्रति किलो होता.

29 सप्टेंबर रोजी एक लाख 44 हजार 100 रुपये होता. अर्थात 30 तारखेला किमतीत एक हजार रुपयांची वाढ झालीये. यातून बाजार आता तेजीत आलाय हे स्पष्ट होते. खरेतर यावर्षी चांदीने आत्तापर्यंत 57% रिटर्न दिले आहेत. केंद्रातील सरकारने जीएसटी 2.0 ची घोषणा झाल्यापासून देशातील बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत.

पुढे सुद्धा ही तेजी कायम राहू शकते. भाव वाढण्याचे कारण म्हणजे जगभरात चांदीचा वापर वाढत आहे. औद्योगिक कंपन्यांमध्ये सुद्धा चांदी वापरली जात आहे. सोलार पॅनेल , इलेक्ट्रिक वाहने, मोबाइल फोन अशा व इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यासाठी चांदीचा वापर करावा लागतो.

याशिवाय चांदीच्या दागिन्यांना पसंती मिळत आहे. गुंतवणुकीसाठी देखील चांदीचा पर्याय फायद्याचा ठरतोय आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. यंदा चांदीची किंमत सर्वाधिक तेजीत असून यातून गुंतवणूकदारांना फायदा होतोय.

मागणी जास्त व पुरवठा कमी असं घडल की वस्तूचा भाव वाढतो. चांदीच्या बाबतीत सध्या अशीच स्थिती आहे. विशेष म्हणजे तज्ञांनी येत्या काळात चांदीच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात 70 डॉलर प्रति औंस पर्यंत वाढणार असल्याचा अंदाज दिला आहे.

तसेच देशांतर्गत बाजारात चांदीची किंमत दोन लाख रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकते असे पण म्हटले जात आहे. येत्या एका वर्षात चांदीची किंमत साधारणता दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News