10 वर्षात एक कोटी रुपयांचा फंड जमा करायचा असेल तर किती रुपयांची एसआयपी करावी लागणार? वाचा सविस्तर

Published on -

SIP Plan : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. शेअर मार्केट मधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत असल्याने अनेक जण यात पैसा लावत आहेत. परंतु शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना मार्केटचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.

यामुळे ज्या लोकांना शेअर मार्केटचे फारसे ज्ञान नसते असे लोक म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात. दरम्यान जर तुम्ही ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल आणि तुमचे दहा वर्षात एक कोटी रुपयांचे फंड जमवण्याचे ध्येय असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.

खरे तर आज आपण एक कोटी रुपयांचा फंड जमा करण्यासाठी दर महिन्याला किती रुपयांची एसआयपी करायला हवी याबाबत माहिती पाहणार आहोत. जस की आपणास माहीतच आहे की एसआयपी हा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचा शिस्तबद्ध प्रकार आहे.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून दरमहा ठराविक रक्कम तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंडमध्ये जमा केली जाते.

त्या बदल्यात गुंतवणूकदारांना एनएव्हीवर आधारित यूनिट मिळत असते. गुंतवणूकदारांना पाचशे रुपयांपासून एसआयपी करता येते. यामुळे एसआयपी छोट्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरत आहे.

एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरासरी वार्षिक 12 टक्के दराने परतावा मिळतो. अशा तऱ्हेने जर एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढवण्यात आली तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. 

10 वर्षात एक कोटीचा फंड कसा तयार करायचा?

म्युचल फंड मधील गुंतवणूक ही नक्कीच शेअर मार्केट वर आधारित आहे. पण इथे शेअर मार्केट पेक्षा कमी जोखीम आहे. म्युचल फंड मधूनच सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळत नाही. परंतु शेअर मार्केटच्या तुलनेत यामधील जोखीम कमी असल्याने अलीकडे अनेक जण म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करत आहे.

तुम्हालाही एसआयपी करायची असेल आणि तुम्ही दहा वर्षात एक कोटीचा फंड तयार करण्याचे ठरवले असेल तर तुम्हाला दर महिन्याला 43 हजार 150 रुपये एसआयपी करावी लागणार आहे.

दरमहा 43 हजार 150 रुपयांची एसआयपी केल्यास आणि तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 12 टक्के रिटर्न मिळाल्यास दहा वर्षात तुम्ही एक कोटीचा फंड जमा करू शकता.

जर समजा तुम्ही केलेल्या एसआयपीवर तुम्हाला 14% रिटर्न मिळत असतील तर तुम्ही 38 हजार 250 रुपयांच्या एसआयपीद्वारे दहा वर्षात एक कोटी पेक्षा अधिकचा फंड जमा करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe