10 वर्षात 1 कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर किती रुपयांची SIP करावी लागेल?

Published on -

SIP Plan : अलीकडे भारतात शेअर मार्केटमध्ये तसेच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पूर्वी गुंतवणुकीसाठी बँकांच्या एफडी योजनांना तसेच पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना अधिक महत्त्व दाखवले जात असे. पण आता अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दाखवत आहेत.

शेअर मार्केट मधून तसेच म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतोय. दरम्यान जर तुम्हाला ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाची राहणार आहे.

आज आपण दहा वर्षात एक कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर किती रुपयांचा एसआयपी करावा लागणार याबाबत माहिती पाहणार आहोत. खरंतर म्युच्युअल फंडात दरमहा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन थ्रो एक ठराविक रक्कम गुंतवून गुंतवणूकदारांना मोठा फंड जमा करता येऊ शकतो.

पण यासाठी गुंतवणूकदारांना काही काळ वाट पहावी लागणार आहे. एसआयपी तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा गुंतवणूकदार लॉन्ग टर्म मध्ये पैसा गुंतवतात. तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये एसआयपी मधून फारसा रिटर्न मिळणार नाही. खरेतर, म्युचल फंड मध्ये एसआयपी सुरू केल्यास गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा पण लाभ मिळतो.

म्हणजेच गुंतवणूकदारांना व्याजावर व्याज मिळते. एसआयपीचा एक चांगला फायदा म्हणजे तुम्हाला यात एक रकमी पैसा गुंतवावा लागत नाही. तुम्ही यामध्ये दरमहा छोटी रक्कम गुंतवून लॉंग टर्म मध्ये कोटींचा फंड तयार करू शकता. एस आय पी काही वर्षातच गुंतवणूकदारांना करोडपती बनवू शकते.

दरम्यान आज आपण एसआयपी मधून एक कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर साधारणतः दरमहा किती रुपयांची एसआयपी करावी लागणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

दहा वर्षात एक कोटी रुपयांचा फंड जमवायचा असेल तर किती रुपयांची एसआयपी करावी लागणार? तसेच 15 वर्षात एक कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर किती एसआयपी करावी लागणार याचच कॅल्क्युलेशन आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

किती SIP करावी लागणार?

एसआयपी मधून साधारणता 12% रिटर्न मिळतात. अशा तऱ्हेने जर तुम्हाला दहा वर्षात एक कोटी रुपयांचा फंड जमवायचा असेल तर 45,000 रुपयांची एसआयपी करावी लागणार आहे. तुम्ही दर महिन्याला चाळीस हजार रुपयांची एसआयपी सुरू केली तर दहा वर्षांनी 92 लाखाहून अधिक रक्कम तुम्हाला मिळणार आहे.

15 वर्षात किती फंड मिळणार?

दरमहा फक्त 20000 रुपयांची एसआयपी सुरु केली यावर वार्षिक 12 टक्के दराने रिटर्न मिळाले तर पंधरा वर्षांनी एक कोटीचा फंड तयार होईल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा एसआयपी वरील रिटर्न फिक्स नसतात. म्युच्युअल फंड शेअर बाजारावर आधारित आहे. यामुळे येथे फिक्स रिटर्न मिळत नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe