SIP Vs PPF : दरवर्षी 50 हजाराची गुंतवणूक केल्यास SIP मधून जास्त रिटर्न मिळणार की PPF मधून ? वाचा….

Published on -

SIP Vs PPF : जर तुम्हीही तुमच्याकडील पैसे कुठे गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण शेअर बाजारावर आधारित असणाऱ्या म्युच्युअल फंड एसआयपी तसेच पीपीएफ या सरकारी बचत योजनेची तुलना करणार आहोत.

कशी आहे PPF योजना ?
पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी बचत योजना आहे. यामध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित आहे. म्हणजेच तुमचे पैसे कुठेच वाया जाणार नाही याची गॅरंटी स्वतः सरकार घेते. सध्या पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकारकडून 7.10% दराने परतावा दिला जात आहे.

या योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना 15 वर्षांनी मॅच्यूअर होते. या योजनेत गुंतवणूकदारांना वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येते. किमान पाचशे रुपयांपासून ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची वार्षिक गुंतवणूक यामध्ये करता येते. म्हणजे तुम्ही पीपीएफ अकाउंट ओपन केले तर यात प्रत्येक वर्षी दीड लाख रुपयांपर्यंतची अमाऊंट जमा करू शकता

आणि या अमाऊंटवर तुम्हाला सरकारकडून 7.10% दराने व्याज दिले जाणार आहे. जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजनेत दरवर्षी 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच पंधरा वर्षानंतर 13 लाख 56 हजार 70 रुपये मिळणार आहेत.

एसआयपीमधून किती रिटर्न मिळणार?

म्युच्युअल फंड एसआयपी बाबत बोलायचं झालं तर या ठिकाणी केलेली गुंतवणूक ही जोखीम पूर्ण आहे. या गुंतवणुकीला शेअर बाजाराची जोखीम असते. शेअर बाजारात होणाऱ्या चढउताराचा म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकीला फटका बसतो. शिवाय यामधून मिळणारे रिटर्न हे निश्चित नसतात. म्हणजेच कधी गुंतवणूकदारांना जास्त परतावा मिळणार तर कधी गुंतवणूकदारांना फारच कमी परतावा मिळेल.

परंतु सरासरी रिटर्नचा विचार केला तर एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अवरेज 12% दराने रिटर्न मिळत आहेत. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने एसआयपी मध्ये प्रत्येक महिन्याला 4167 रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांची वार्षिक गुंतवणूक ही 50 हजार 4 रुपये एवढी होणार आहे आणि ही गुंतवणूक त्यांनी 15 वर्षांसाठी सुरू ठेवली तर एसआयपीमधून 21 लाख रुपये मिळू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe