Small Business Idea : तुम्हालाही नवा बिजनेस स्टार्ट करायचा आहे का मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, आजकाल भारतात नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते, परंतु वास्तव अगदीचं वेगळ आहे.
कारण, कमी गुंतवणुकीत देखील काही व्यवसाय सुरू होऊ शकतात. दरम्यान आज आपण असे दोन बिजनेस पाहणार आहोत जे की फक्त दहा हजाराच्या गुंतवणुकीत स्टार्ट होऊ शकतात आणि त्यातून तुम्हाला महिन्याला चाळीस हजार रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते.

परंतु यासाठी तुम्हाला तुमचा बिजनेस योग्य पद्धतीने चालवता येणे आवश्यक आहे. योग्य दिशा, थोडी समज आणि कठोर परिश्रम या तीन सूत्रांचा वापर केल्यास तुम्हाला या व्यवसायातून नक्कीच चांगला मोठा फायदा होणार आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा दोन लहान व्यवसाय कल्पनांबद्दल सांगणार आहोत जे कमी खर्चात सुरू होऊ शकतात आणि यातून तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून कमाई होऊ शकते.
अगरबत्ती व्यवसाय – तुम्हाला कमी गुंतवणुकीत अधिक नफा हवा असेल तर तुम्ही अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करायला हवा. अगरबत्ती हे असे एक प्रॉडक्ट आहे ज्याची मागणी बारा महिने असते. विशेष म्हणजे सणासुदीच्या दिवसांमध्ये या प्रोडक्टची मागणी वाढते.
यामुळे हा व्यवसाय तुमच्यासाठी एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो. हा बिजनेस तुम्ही फक्त एक लहान खोली आणि काही मूलभूत यंत्रणा आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला यासाठी फक्त दहा हजाराचा खर्च करावा लागणार आहे.
चारकोल पावडर, परफ्यूम आणि बांबू स्टिक असा कच्चा माल खरेदी करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. विशेष म्हणजे स्थानिक बाजारपेठेत तुम्हाला या सगळ्या वस्तू लगेच मिळतील.
अगरबत्ती तयार करून सुरूवातीस स्थानिक दुकानातं पुरवठा करा आणि मग ब्रँडिंगवर लक्ष केंद्रित करा. सुगंध आणि गुणवत्ता चांगली असल्यास लवकरच तुमचा ब्रँड मोठा होऊ शकतो. या व्यवसायातून तुम्हाला महिन्याकाठी 35 – 40 हजार रुपयांची कमाई होऊ शकते.
मसाल्यांचा व्यवसाय – जर तुम्ही घरून काम करण्याचा विचार करत असाल, तर मसाले बनवण्याचा व्यवसाय हा एक उत्तम पर्याय आहे. भारतात मसाल्यांची मागणी फार मोठी आहे. तुम्हाला फक्त 10 हजार मध्ये ग्राइंडर, पॅकिंग साहित्य आणि काही मूलभूत मसाले खरेदी करावे लागतील.
लहान सुरुवात करा आणि स्थानिक स्टोअरमध्ये किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर (अमेझॉन, फ्लिपकार्ट) तुमची उत्पादने विका. गुणवत्ता आणि पॅकेजिंगकडे लक्ष दिल्यास हा व्यवसाय दरमहा 40,000 पर्यंतची कमाई करून देऊ शकतो.