Work From Home : महिलांसाठी संधी, 25 हजाराची मशीन अन महिन्याला होणार 30 हजाराची कमाई 

Published on -

Small Business Idea : तुम्हालाही नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तर तुम्ही या दिवाळीत अवघ्या 25 ते 30 हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला चांगली कमाई सुद्धा होणार आहे.

हा व्यवसाय महिला किंवा पुरुष कोणीही करू शकतो पण महिलांसाठी हा व्यवसाय अधिक फायदेशीर ठरणार आहे. हा व्यवसाय तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथूनच सुरू करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला फार मोठे दुकान उभे करावे लागणार नाही.

मंडळी आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो व्यवसाय आहे लॅम्प वॅक्स बनवण्याचा अर्थातच दिव्याची वाती बनवण्याचा. येत्या काही दिवसांनी दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे. दिवाळीत अर्थात दीपोत्सवात दरवर्षी हा बिजनेस ट्रेंड मध्ये येतो.

दिवाळीच्या काळात या व्यवसायातून सर्वाधिक कमाई होत असते. विशेष म्हणजे फक्त दिवाळीतच नाही तर बाराही महिने हा व्यवसाय चालतो आणि यातून हजारो रुपयांची कमाई तुम्हाला होऊ शकते.

दरम्यान आज आपण या व्यवसायाचे संपूर्ण गणित आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत. दिव्याची वाती तयार करण्यासाठी कोणते मशीन लागते, त्याची किंमत काय असते आणि यातून किती मार्जिन मिळू शकतो याचाच आढावा आज आपण या लेखातून घेऊयात. 

महिलांसाठी ठरणार बेस्ट बिजनेस

महिलांना जर वर्क फ्रॉम होम करायचे असेल तर हा बिजनेस त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन राहील. दिव्यासाठी लागणाऱ्या कापसाच्या वाती बनवण्याची प्रोसेस फारच सोपी आहे. कापसाच्या वाती महिला हाताने सुद्धा बनवतात. पण तुम्हाला कापसाच्या वातीचा बिजनेस सुरु करायचा असेल तर छोटस मशीन घ्यावं लागणार आहे.

हे मशीन तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. अर्थात मॅन्युअल, सेमी ऑटोमॅटिक किंवा ऑटोमॅटिक असे कोणतेही एक मशीन तुम्ही खरेदी करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. कापसाची वात बनवण्यासाठी तुम्हाला एक मशीन लागणार आहे आणि कच्चं मटेरियल म्हणून कापूस लागणार आहे.

यापलीकडे तुम्हाला या व्यवसायासाठी कोणताच मोठा खर्च करावा लागत नाही. आता आपण कापसाची वात नेमकी कशी बनते हे समजून घेऊयात. वाती बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कापसाचे छोटे तुकडे करायचे आहेत. यानंतर हे तुकडे पाण्याने ओले करून तुम्हाला वात बनवायची आहे.

तुम्ही मशीन मधून सुद्धा या वाती बनवू शकता. याची किंमत साधारणता 4000 पासून सुरु होते. ऑटोमॅटिक मशीन घ्यायचे असेल तर 30000 मोजावे लागतील. या व्यवसायातून किती कमाई होणार हे तुमच्या विक्रीवर अवलंबून असेल. पण जर तुमचा हा बिजनेस चांगला सेट झाला तर साधारणतः 20 ते 30 हजार रुपये तुम्हाला या व्यवसायातून मिळू शकतात.

अर्थातच हा एक अंदाज आहे. या व्यवसायासाठी तुम्हाला कापसाची खरेदी करावी लागणार आहे. कापूस तुम्ही थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केला तर तुमचाही फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांचा सुद्धा होईल. यामुळे थेट शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून तुम्ही हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe