Small Business Idea : कमी भांडवलात सुरु करा हे 5 दमदार व्यवसाय ! होईल बक्कळ नफा

Ahmednagarlive24 office
Published:
Small Business Idea

Small Business Idea : नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अनेक छोटे व्यवसाय आहे जे तुम्ही कमी भांडवलात सुरु करू शकता. छोटे व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.

व्यवसायासाठी जास्त पैसे खर्च होतील या दृष्टीने अनेकजण व्यवसायात उतरण्याअगोदरच माघार घेत असतात. मात्र आता तुम्ही असे व्यवसाय सुरु करू शकता ज्याला बाजारात चांगली मागणी आहे. तसेच ते सुरु करण्यासाठी जास्त पैशांची देखील गरज नाही.

1. नाश्ता सेंटर

भारतात खवय्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकांना दररोज काही ना काही नवनवीन खाण्याची आवड असते. साली उठल्याबरोबर अनेकांना नाश्ता करण्याची सवय असते. त्यामुळे तुम्ही नाश्ता सेंटर सुरु करू शकता. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता ठेऊ शकता. स्नॅक्ससह पारंपारिक नाश्ता तुम्ही तुमच्या सेंटरवर ठेऊ शकता. यामधून तुम्ही बक्कळ कमाई करू शकता.

2. ज्यूस पॉइंट

उन्हाळ्याच्या दिवसांतच नाही तर सर्वच ऋतूमध्ये अनेकजण ज्यूसचे सेवन करत असतात. ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असल्याने त्याची मागणी देखील अधिक आहे. टीमउळे कमी पैशात तुम्ही ज्यूस पॉइंट सुरु करून चांगली कमाई करू शकता.

3. ऑनलाइन व्यवसाय

इंटरनेटशी संबंधित देखील अनेक व्यवसाय उपलब्ध आहेत. तुम्ही देखील काही ऑनलाइन व्यवसाय सुरु करू शकता. सोशल मीडिया विशेषज्ञ, ब्लॉगर्स, वेबसाइट डिझायनर आणि विकसकांची मागणी जास्त आहे. अशा व्यवसायांना फक्त मूलभूत संगणक प्रणाली, सॉफ्टवेअर आणि हायस्पीड इंटरनेटची आवश्यकता असते.

4. फोटोग्राफी

तुम्हालाही फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही सहज कमी खर्चात फोटोग्राफीचा व्यवसाय सुरु करू शकता. यासाठी तुमच्याकडे एक चांगला कॅमेरा असण्याची आवश्यक आहे. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात फोटोग्राफरची मागणी जास्त आहे.

5. सलून व्यवसाय

सध्या सलूनचा व्यवसाय तुम्हाला मालामाल करू शकतो. या व्यवसायातून तुम्ही दरमहा बक्कळ कमाई करू शकता. तुम्ही हा व्यवसाय गावाकडे किंवा शहरामध्ये देखील करू शकता. सध्या सलूनचा व्यवसाय ट्रेंडिगमध्ये सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe