Small Business Idea : येत्या दिवाळीत तुम्हालाही नवा व्यवसाय सुरू करायचा आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. अलीकडे नोकरीमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
पूर्वी जशी सरकारी नोकरीमध्ये स्पर्धा होती तशीच स्पर्धा आता खाजगी नोकरीमध्ये देखील पाहायला मिळते. याशिवाय गेल्या काही वर्षात अनेक कंपन्यांनी नोकर कपात सुद्धा केली आहे.

आयटी प्रमाणेच आता ऑटो क्षेत्रातही नोकर कपात होण्याचे संकट आहे. अशी सगळी परिस्थिती असताना आता नवयुवक तरुण व्यवसायाकडे वळत आहेत. तर काही तरुण नोकरी मधून अपेक्षित कमाई होत नसल्याने पार्ट टाइम व्यवसाय करत आहेत.
दरम्यान जर तुम्हालाही फुल टाईम व्यवसाय करायचा असेल किंवा नोकरी सोबतच पार्ट टाइम व्यवसाय करायचा असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आज आपण दिवाळीत सर्वाधिक नफा कमवून देणाऱ्या व्यवसायांबाबत माहिती पाहणार आहोत.
फुलांचा व्यवसाय – दिवाळी फुलांना प्रचंड मागणी असते. पूजेसाठी तसेच घर सजावटीसाठी, वाहनांसाठी फुलांची मागणी वाढते. दिवाळीत नवीन वाहनांची खरेदी वाढत असल्याने फुलांचीही मागणी वाढते.
त्यामुळे जर तुम्हाला दिवाळीत नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तर तुम्ही फुलांचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही थेट शेतकऱ्यांकडून फुलं खरेदी करून याची रिटेलमध्ये विक्री करू शकता.
तुम्ही एखादा गाळा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी तुमचे फुल भांडार सुरू करू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे फक्त दिवाळीचं नाहीतर हा व्यवसाय तुम्ही 12 महिने सुरू ठेवू शकता.
दिवे-पणत्या व मूर्तीचा बिजनेस – दिवाळीत दिव्यांची आणि पणत्यांची प्रचंड मागणी असते. याशिवाय देवी-देवतांची मूर्ती देखील मागणीत असते. दिवाळीत गणेश भगवान तसेच देवी लक्ष्मीच्या मूर्तींची मागणी वाढते.
अशा स्थितीत जर तुम्हाला दिवाळी एखादा नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही मूर्ती विक्रीचा तसेच दिवे – पणत्या विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही होलसेल मार्केट मधून माल खरेदी करून तुमच्या शहरातील रिटेल मार्केटमध्ये याची विक्री केल्यास तुम्हाला चांगला फायदा होणार आहे.
हा व्यवसाय सुद्धा तुम्ही बारा महिने सुरू ठेवू शकता. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव या काळात सुद्धा मूर्तींची व पणत्यांची प्रचंड मागणी असते. याला जोडीला तुम्ही पूजेचे साहित्य सुद्धा ठेवायला हवे.