Small Business Idea : तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे का? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. अलीकडे भारतात नवनवीन स्टार्टअप सुरू झाले आहेत. तरुण वर्ग आता नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य देत आहे. दरम्यान जर तुम्हाला ही छोट्याशा गुंतवणुकीत बिजनेस स्टार्ट करायचा असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक भन्नाट बिजनेस प्लॅन घेऊन आलो आहोत.
आज आपण ज्या बिजनेस ची माहिती पाहणार आहोत तो बिझनेस फक्त एका लाखाच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतो आणि यातून तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून पैसे मिळतील. एका लाखाच्या गुंतवणुकीत तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीज बिजनेस सुरू करू शकता. हे युग कम्प्युटर आणि मोबाईलचे युग आहे.

आता पहिली दुसरीच्या मुलांकडे सुद्धा मोबाईल आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासाच आता मोबाईलवर होतोय. यामुळे स्मार्टफोनचे मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे आणि मोबाईल ॲक्सेसरीज ची मागणी सुद्धा सातत्याने वाढत आहे.
अशा स्थितीत जर तुम्हाला तुमचा स्वतःचा युनिक बिजनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीज बिजनेस नक्कीच सुरू केला पाहिजे. हा एक असा बिजनेस आहे जो की तुम्ही अवघ्या एका लाखाच्या गुंतवणुकीत स्टार्ट करू शकता आणि यातून तुम्हाला पहिल्या महिन्यालाचं हजारो रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे. या व्यवसायातून तुम्ही वार्षिक लाखो रुपयांची कमाई करू शकता.
गावातही सुरू करता येऊ शकतो व्यवसाय मोबाईल ॲक्सेसरीज बिजनेस ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फार मोठी जागा लागत नाही आणि लोकेशन सुद्धा मॅटर करत नाही. तुम्ही हा बिजनेस कुठूनही स्टार्ट करू शकता.
ऑफलाइन सोबतच ऑनलाईन देखील या बिझनेसला अलीकडे मोठी डिमांड आली आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला दहा बाय दहा चा गाळा सुद्धा पुरेसा ठरणार आहे. या व्यवसायासाठी तुम्हाला सुरुवातीला विविध कंपन्यांचे मोबाईल ॲक्सेसरीज खरेदी करावे लागतील जे की तुम्ही 80 हजारापासून ते एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीत सहज खरेदी करू शकता आणि तुमच्या व्यवसायाची सुरुवात होणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे एका लाखाच्या गुंतवणुकीत तुम्ही दर महिन्याला 15000 ते 30 हजार रुपये कमवू शकता. आज आपल्यापैकी कित्येकांकडे दोन दोन स्मार्टफोन आहेत. एक बिझनेस किंवा ऑफिसच्या युजसाठी आणि एक पर्सनल युजसाठी असे दोन स्मार्टफोन आता प्रत्येकाकडे झाले आहेत.
यामुळे मोबाईल ॲक्सेसरीज बिजनेसची मागणी सातत्याने वाढत आहे. स्मार्टफोनसाठी कव्हर, टेम्पर्ड ग्लास, चार्जर, इअरफोन, ब्लूटूथ डिव्हाइस आणि पॉवर बँक यासारख्या अॅक्सेसरीज गरजेच्या असतात ज्या की मोबाईलच्या सुरक्षितता वाढवतात तसेच यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव मिळतो.
विशेष म्हणजे मोबाईल जेवढा लॉंग लास्टिंग टिकतो तेवढ्याच ॲक्सेसरीज टिकत नाहीत ॲक्सेसरीज वारंवार खरेदी कराव्या लागतात. याशिवाय जेव्हा स्मार्टफोन कंपन्या नवीन मॉडेल लॉन्च करतात तेव्हा ॲक्सेसरीज ची मागणी वाढते. सणासुदीच्या काळात स्मार्टफोनची विक्री वाढल्यानंतरही ॲक्सेसरीज ची डिमांड वाढत असते.
तुम्हाला जर ऑनलाईन खरेदी करायची असेल तर तुम्ही इंडिया मार्ट सारख्या वेबसाईटवरून ॲक्सेसरीज खरेदी करू शकता आणि रिटेल मध्ये विकू शकता. किंवा तुम्ही तुमच्या जवळील मोठ्या शहरांमध्ये असणाऱ्या घाऊक मार्केट मधून ॲक्सेसरीज खरेदी करू शकता.













