Small Business Idea : तुम्हालाही पुढच्या वर्षी नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर अलीकडे नोकरी व्यवसायाला विशेष प्राधान्य दाखवले जात आहे. नऊ ते पाच अशा रुटीन कामाऐवजी व्यवसायाला अधिक महत्त्व दिले जात आहे.
कोरोना काळापासून देशात अनेक नवीन व्यवसाय सुरू झाले आहेत आणि या व्यवसायांमधून व्यवसायिकांना चांगला नफा सुद्धा मिळतोय. कोरोना पासून देशात नवनवीन स्टार्टअप सुरू होत आहेत. विशेष म्हणजे व्यवसायाला सरकारकडून चांगले प्रोत्साहन सुद्धा मिळत आहे.

नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून व्यवसायिकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.
पीएम मुद्रा योजना ही देखील अशीच एक महत्त्वाची योजना आहे. दरम्यान, जर तुम्हालाही नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही शासनाची मदत घेऊन नवीन बिजनेस सुरू करू शकता आणि नोकरीपेक्षा कित्येक पटीने अधिक पैसा व्यवसायातून कमवू शकता.
2026 मध्ये हे व्यवसाय देतील जबरदस्त नफा
मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात स्मार्टफोनचे मार्केट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज जवळपास प्रत्येकाकडे महागडे स्मार्टफोन आहेत. अशा स्थितीत जर तुम्हाला नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय सुरू करायला हवा.
या व्यवसायातून तुम्हाला नक्कीच चांगली कमाई होणार आहे. मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल रिपेरिंगचा कोर्स करावा लागणार आहे. हा कोर्स दोन ते तीन महिन्यांचा असतो आणि कोर्स केल्यानंतर तुम्ही सहज मोबाईल रिपेरिंग करू शकता.
मोबाईल रिपेरिंग सोबतच तुम्ही मोबाईल विक्रीचा पण व्यवसाय करू शकता. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात भांडवल नसेल तर तुम्ही मोबाईल रिपेरिंग पासून तुमच्या व्यवसायाची सुरुवात करू शकता.
मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय सुरू करून तुम्ही महिन्याकाठी 40 ते 50 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न कमवू शकता. या व्यवसायासोबतच तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीज विक्रीचा पण व्यवसाय करायला हवा जिथून तुम्हाला आणखी अतिरिक्त कमाई होणार आहे.
ऑनलाइन ट्युशनचा व्यवसाय : पूर्वी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी कोचिंग साठी त्यांच्या शहरातील बेस्ट कोचिंग सेंटर मध्ये ऍडमिशन घेत असत. मात्र आता या ऑनलाइन युगात सारं काही घरबसल्या मिळते. ट्युशन सुद्धा विद्यार्थ्यांना घर बसल्या घेता येते.
अशा स्थितीत जर तुम्ही एखाद्या विषयात पदवी घेतली असेल तर तुम्हीही ऑनलाइन ट्युशन चा बिजनेस स्टार्ट करू शकता. तुम्ही कम्प्युटर, कोडींग, मॅथेमॅटिक्स, इंग्लिश स्पीकिंग कोर्स असे वेगवेगळ्या विषयाचे कोचिंग देऊ शकता. ऑनलाइन ट्युशन बिजनेस मधून तुम्हाला दरमहा 50 हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते.
डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस : आजकाल लहानातला लहान व्यवसाय ऑनलाइन जाऊ इच्छितो. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यवसायाला डिजिटल मार्केटिंगची गरज भासू लागली आहे. दुकाने, जिम, रेस्टॉरंट्स, कोचिंग सेंटर प्रत्येकाला डिजिटल मार्केटिंगची आवश्यकता आहे.
त्यामुळे तुम्ही डिजिटल मार्केटिंग सर्विस चा व्यवसाय करायला हवा. हा बिजनेस स्टार्ट करून तुम्ही सोशल मीडिया व्यवस्थापन, पोस्ट डिझाइन आणि वेबसाइट सेटअप सारखी कामे करू शकता. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही महिन्याकाठी 50000 पासून ते तीन लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकता.













