Small Cap Mutual Fund:- स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड हे लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन मोठ्या परताव्याची संधी देणारे फंड असतात. जरी या फंडांमध्ये जोखीम जास्त असली तरी गेल्या काही वर्षांत विशेषतः २०२० नंतर स्मॉल-कॅप फंडांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे.
२०२५ मध्येही स्मॉल-कॅप फंडांमध्ये गुंतवणुकीला मोठी मागणी आहे. कारण अनेक लहान कंपन्या वेगाने वाढत आहेत आणि त्यांचे मार्केट शेअर वाढत आहे. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीच्या शोधात असाल आणि जोखीम घेण्याची तयारी असेल तर हे स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड्स एक उत्तम पर्याय ठरू शकतात.
![small cap fund](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/zx.jpg)
गुंतवणुकीसाठी फायद्याचे स्मॉल कॅप फंड
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड
हा या श्रेणीतील सर्वात लोकप्रिय फंडांपैकी एक आहे. गेल्या तीन वर्षांत या फंडाने सरासरी २२.९५% परतावा दिला आहे. तर मागील वर्षात त्याने ३१.८६% चा मजबूत परतावा दिला आहे.
हा फंड लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो आणि दीर्घकालीन वाढीच्या संधी शोधतो. जर तुम्ही स्मॉल-कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा फंड चांगला पर्याय ठरू शकतो.
टाटा स्मॉल कॅप फंड
हा देखील एक स्थिर आणि विश्वासार्ह फंड आहे. हा फंड गेल्या ३ ते ५ वर्षाच्या गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे.गेल्या तीन वर्षांत या फंडाने २२.४५% परतावा दिला आहे.
तर पाच वर्षांत त्याचा परतावा २९.६४% इतका आहे. टाटा ग्रुपच्या विश्वासार्हतेमुळे आणि या फंडाच्या चांगल्या व्यवस्थापनामुळे तो अनेक गुंतवणूकदारांचा पहिला पर्याय आहे.
क्वांट स्मॉल कॅप फंड
हा गेल्या काही वर्षांमध्ये सर्वाधिक परतावा देणाऱ्या फंडांपैकी एक ठरला आहे. गेल्या पाच वर्षांत या फंडाने ४२.३५% परतावा दिला आहे. जो या श्रेणीतील सर्वाधिक आहे.
याशिवाय गेल्या तीन वर्षांतही या फंडाने २१.९४% परतावा देत गुंतवणूकदारांना समाधान दिले आहे. उच्च परतावा आणि वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या धोरणामुळे हा फंड एक उत्तम पर्याय मानला जातो.
एचएसबीसी स्मॉल कॅप फंड
हा फंड देखील चांगल्या परताव्यासाठी ओळखला जातो. या फंडाने गेल्या तीन वर्षांत २०.३०% परतावा दिला आहे.तर पाच वर्षांसाठी हा परतावा २८.८०% आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा फंडही एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषतः जर तुम्हाला स्थिर परताव्याचा पर्याय हवा असेल तर.
एक्सिस स्मॉल कॅप फंड
हा फंड देखील चांगल्या व्यवस्थापनाखाली चालणारा आणि स्थिर वाढ दर्शवणारा फंड आहे. बाजारातील अस्थिरतेदरम्यानही या फंडाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे जर तुम्ही स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड शोधत असाल तर या फंडांचा विचार करून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता.
स्मॉल कॅप फंडामधील गुंतवणुक करताना हा विचार करा
स्मॉल-कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे.कारण हे फंड अल्पकालीन अस्थिरतेला अधिक सामोरे जातात. जोखीम स्वीकारण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हे फंड मोठ्या संधी देऊ शकतात.
मात्र गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे आणि स्वतःच्या उद्दिष्टांचा विचार करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या गुंतवणूक सल्लागाराशी संपर्क साधू शकता.