Smallcap Stocks:- तुम्हाला जर शेअर बाजारामधून चांगला परतावा मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्ही अल्पकालीन गुंतवणुकी ऐवजी दीर्घकालीन म्हणजेच लॉन्ग टर्म गुंतवणुकीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. यशस्वी गुंतवणुकीसाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि संबंधित कंपनीचे फंडामेंटल जर व्यवस्थित तपासून गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप मोठा फायदा या माध्यमातून मिळू शकतो. अगदी याच प्रकारे तुम्हाला देखील लॉंग टर्म गुंतवणूक करायची असेल तर एसआर प्लस च्या अहवालानुसार काही स्मॉल कॅप शेअर्स चांगला परतावा देण्याची शक्यता आहे. चला तर मग ते शेअर्स नेमके कोणते आहेत याची माहिती बघू.
लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी फायदेशीर शेअर्स
1- आर्टेमिस मेडिकेयर सर्विसेस लिमिटेड- ही कंपनी आर्टेमिस हॉस्पिटल नावाने देखील ओळखली जाते व ही एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवते. ऑर्थोपेडिक्स तसेच ओन्कॉलॉजी आणि कार्डिओलॉजी सारख्या इतर वैद्यकीय शाखांमध्ये उपचाराची सुविधा प्रदान करते. या शेअरमध्ये येणाऱ्या काळात 19 टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे.

2- मेडी असिस्ट हेल्थकेअर सर्व्हिसेस लिमिटेड- ही कंपनी विमा कंपन्यांना थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेशन सेवा देते व यामध्ये हॉस्पिटलची सेवा तसेच कॉल सेंटर मॅनेजमेंट आणि दाव्यांवर प्रक्रिया इत्यादी सेवांचा समावेश आहे व त्यामुळे या कंपनीचे आरोग्य विमा क्षेत्रातील भूमिका महत्त्वाची आहे. सध्या भारतामध्ये आरोग्य विमा बाजारात मोठी वाढ होताना दिसत आहे व त्यामुळे या कंपनीला मोठा फायदा होत आहे. येणाऱ्या काळात या कंपनीच्या शेअरमध्ये 24% पर्यंत वाढीची अपेक्षा वर्तवण्यात आलेली आहे.
3- क्रष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड- ही कंपनी देखील वैद्यकीय क्षेत्रातील असून पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी सेवा पुरवणारी कंपनी म्हणून ओळखली जाते व या कंपनीचे देशात मोठे नेटवर्क आहे. या कंपनीच्या माध्यमातून एमआरआय तसेच सिटीस्कॅन आणि विविध रक्त चाचण्यासारख्या सेवा दिल्या जातात व त्यामुळे आरोग्य क्षेत्रात या कंपनीची भूमिका खूप महत्त्वाची आहे. सध्या आरोग्य सेवा क्षेत्रातील वाढ जर बघितली तर त्या दृष्टिकोनातून या कंपनीच्या शेअर्समध्ये 37% पर्यंत वाढीची शक्यता आहे.
4- अपीजय सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड- ही कंपनी झोन बाय द पार्क, द पार्क आणि फ्लूरीस सारख्या प्रसिद्ध असलेल्या ब्रँडच्या माध्यमातून हॉटेल्स आणि फूड आउटलेट चालवते. तसेच या कंपनीचे देशांमध्ये अनेक शहरात हॉटेल्स असून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये एक मजबूत आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. या सगळ्या अनुषंगाने या कंपनीच्या शेअरमध्ये येणाऱ्या काळात 40% पर्यंत वाढ होण्याचे अपेक्षित असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.