सीएनजी पंपचा बिजनेस सुरु करून महिन्याला कमवा 400000 रुपये ! एक किलो सीएनजी विक्रीतून किती कमिशन मिळते?

Published on -

CNG Pump Business : देशात अलीकडील काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिक कार सोबतच सीएनजी कार देखील मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता मध्यमवर्गीय लोक आता सीएनजी कार खरेदी करण्याला विशेष पसंती दाखवतायेत. पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांना इलेक्ट्रिक कारचा पर्याय आहे. पण आजही देशातील इलेक्ट्रिक कारच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. यामुळे मध्यमवर्गीय जनता सीएनजी गाड्यांच्या खरेदीला पसंती दाखवते. देशात सीएनजी गाड्यांची संख्या वाढत आहे. पण आजही देशात सीएनजी पंप तुलनेने कमी आहेत. यामुळे तुम्ही या संधीचे सोने करू शकता. तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही सीएनजी पंप सुरू करू शकता.

या व्यवसायातून तुम्हाला महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. देशात सीएनजी गाड्यांची संख्या वाढत आहे. मात्र अनेक ठिकाणी सीएनजी पंप नाहीत, यामुळे कारचालकांची कोंडी होते. अशा स्थितीत जर तुमच्याकडे रस्त्यालगत जमीन असेल तर तुम्ही सीएनजी पंप सुरू करून महिन्याला चांगली मोठी कमाई करू शकणार आहात. सीएनजी गाड्यांमुळे प्रदूषण कमी होते तसेच सीएनजीची किंमत पेट्रोल डिझेल पेक्षा कमी आहे. देशात 2030 पर्यंत 10000 नवीन सीएनजी पंप सुरू केले जाणार आहेत. यामुळे अनेकजण सीएनजी पंपची डीलरशिप घेण्याच्या तयारीत आहेत. आता जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि यासाठी तुमच्याकडे चांगले भांडवल असेल तर तुम्ही सुद्धा सीएनजी पंपची डीलरशिप घ्यायला काही हरकत नाही.

सीएनजी पंप सुरू करण्यासाठी किती खर्च करावा लागेल?

या व्यवसासाठी तुमच्याकडे 15000 ते 16000 हेक्टर जागा असणे अनिवार्य आहे. तुमची स्वतःची जागा नसेल तर तुम्ही दीर्घकालीन भाडेतत्त्वावर जागा घेऊ शकता. सीएनजी पंपची डीलरशिप फक्त भारतीय नागरिकांना तसेच 21 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांनाचं दिली जाते. सीएनजी पंपच्या डीलरशिपसाठी कमीत कमी दहावी पास असणे बंधनकारक आहे. सीएनजी पंप सुरू करण्यासाठी तुम्हाला चाळीस-पन्नास लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल. यात लायसनचा खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार अशा विविध बाबींचा समावेश होतो. गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, महानगर गॅस लिमिटेड, महानगर नॅचरल गॅस लिमिटेड, महाराष्ट्र गॅस लिमिटेड, गुजरात स्टेट पेट्रोलियम प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांकडून सीएनजी पंपाची डीलरशिप घेता येते.

किती कमाई होऊ शकते ?

हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला लगेचच कमाई मिळणार आहे. रिपोर्टनुसार एक किलो सीएनजी विक्रीनंतर पंपचालकाला 70 पैशांपासून एक रुपयापर्यंत कमिशन दिले जाते. जर तुमच्या पंपावर सीएनजीची खपत चांगली होत असेल तर तुम्ही महिन्याला दोन ते तीन लाख रुपये सहज कमवू शकता. तसेच तुमचा पंप एखाद्या मेट्रो शहराजवळ असेल तर तुमची कमाई चार लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. पण या व्यवसायातून होणारी कमाई विक्रीवर अवलंबून असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe