Small Business Idea : गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञानाचा वापर मोठा वाढला आहे. आता प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. तंत्रज्ञानाच्या आणि यंत्रांच्या माध्यमातून सर्वच कामे सोपी झाली आहेत. घरकामांसाठी देखील आता वेगवेगळी यंत्रे बाजारात लॉन्च होऊ लागली आहे. घर साफ करण्यासाठी आता व्हॅक्युम क्लिनर सारखे आधुनिक यंत्रांचा वापर होत आहे.
काही ठिकाणी तर रोबोटच्या साह्याने घर कामे केली जात असल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेत. पण असले तरी आपल्या भारतात अजूनही व्हॅक्युम क्लिनर ऐवजी झाडूने साफसफाई करण्याला विशेष पसंती दाखवली जाते. याचे कारण म्हणजे व्हॅक्युम क्लिनर प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊ शकत नाही. विदेशातील घरांमध्ये कमी सामान असते यामुळे तेथे व्याक्युम क्लिनरचा उपयोग मोठा फायदेशीर ठरतो.
आपल्या देशात मात्र घर सामान अधिक असते यामुळे व्हॅक्युम क्लिनर आणूनही त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे भारतात शहर असो की ग्रामीण भाग सर्वत्र त्यांची साफसफाई करण्यासाठी कार्यालयांची साफसफाई करण्यासाठी झाडूचा वापर केला जातो. हिंदू धर्मातील लोक तर झाडूचे पूजनही करतात. याला धार्मिक महत्त्वही प्राप्त आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर झाडू बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. झाडूला बाजारात बारा महिने मागणी असते. यामुळे जर हा बिझनेस तुम्ही सुरू केला तर तुम्हाला बारा महिने कमाई होत राहणार आहे. तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला फारसे भांडवल देखील गुंतवावे लागणार नाही. व्यवसाय घरातूनच सुरू केला जाऊ शकतो. या व्यवसायासाठी स्पेशल जागेची देखील गरज भासत नाही.
झाडू बनवण्याचे यंत्र
हा व्यवसाय सुरू करण्याआधी, तुम्हाला काही मशीन्स विकत घ्याव्या लागतील. जर तुम्हाला झाडू बनवायचा असेल आणि कमी वेळेत जास्त झाडू बनवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला झाडू बनवण्याचे मशीन घ्यावे लागेल. जेणेकरून कमी वेळात जास्त झाडू बनवता येतील.
झाडू तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य
झाडू हँडल कॅप
स्ट्रोस्पिंग वायर
प्लास्टिक आणि ज्यूट सुतळी किंवा दोरी
नारळाची पाने
ताडाची पाने
काठी इ.
झाडू बनवण्याची पद्धत
झाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काठी तारात बांधावी लागेल आणि त्यावर नारळाचे पान किंवा खजुराचे पान जोडावे लागेल.
यानंतर तुम्हाला झाडूचा आकार द्यावा लागेल.
मग तुम्हाला ते प्लास्टिक दोरी किंवा सुतळीने बांधावे लागेल.
किती गुंतवणूक करावी लागणार
झाडू बनवण्याचा व्यवसाय किमान 20 हजार रुपये खर्चून सुरू केला जाऊ शकतो. हे पैसे मशीन आणि इतर आवश्यक वस्तूंवर खर्च होतील. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरू करायचा असेल तर किमान एक लाख रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. यामध्ये व्यवसायासाठीच्या मार्केटिंगसाठी थोडासा पैसा खर्च करावा लागणार आहे, दुकानासाठी पैसा खर्च करावा लागणार आहे.
नफ्याबद्दल बोलायचे झाले तर या व्यवसायातून दरमहा 20 ते 30 हजार रुपयांचा नफा सहज मिळू शकतो, असा दावा केला जात आहे. पण जेवढा तुमचा सेल वाढेल तेवढे उत्पन्न वाढणार आहे. जर सेल कमी झाला तर उत्पन्नही कमी होणार आहे.