Stock Market Crash | सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारपेठांतील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला असून, गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. Jaguar Land Rover JLR) कडून अमेरिकेत एप्रिल महिन्यासाठी वाहनांची शिपमेंट तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा परिणाम टाटा मोटर्सच्या समभागांवर मोठ्या प्रमाणात झाला.
टाटा मोटर्सच्या शेअर्सवर परिणाम-
Bombay Stock Exchange चा Sensex तब्बल 3,600 अंकांनी घसरला, तर Nifty 1,400 अंकांनी खाली आला. हे आकडे पाहता ‘Black Monday’ म्हणून आठवड्याची सुरुवात झाली. ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आयात शुल्कवाढीच्या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिरता निर्माण झाली असून, याचा फटका थेट भारतीय बाजारालाही बसलेला आहे.

विशेष म्हणजे, टाटा मोटर्सचे शेअर्स 9% नी घसरले आहेत. टाटा मोटर्सची उपकंपनी Jaguar Land Rover ही अमेरिकेत गाड्यांची निर्यात करते. परंतु आयात शुल्क वाढवण्यात आल्यानंतर या गाड्यांची शिपमेंट तात्पुरती स्थगित करण्यात आली. त्यामुळे टाटा मोटर्सच्या शेअर्सवर थेट परिणाम झालेला आहे.
फक्त टाटा मोटर्सच नव्हे तर इतर अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्सही घसरले. टाटा स्टीलचा शेअर सर्वाधिक 10.43% नी घसरून 125.80 रुपयांवर आला. Infosys (-7.01%), Tech Mahindra (-6.85%), L&T (-6.19%), HCL Tech (-5.95%), Adani Ports (-5.54%), TCS (-4.99%), Reliance (-4.55%) आणि NTPC (-4.04%) यांचाही समावेश आहे.
बँकिंग शेअरही घसरले-
बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही घसरण दिसून आली आहे. SBI , ICICI Bank , HDFC Bank , Axis Bank , Kotak Bank , IndusInd Bank , Maruti , Titan आणि Bajaj Finance यांच्यात 2-3% ची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे एकूण बाजारात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
यामुळे गुंतवणूकदारांच्या नफ्यावर परिणाम झाला असून, काही तज्ज्ञांच्या मते, अजून काही दिवस बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक आणि सल्ल्यानंतरच पुढील पावले उचलावीत.