Stock Market Crash | सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे तब्बल 19 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अमेरिकन अध्यक्ष Donald Trump यांनी जाहीर केलेल्या टॅरिफ निर्णयामुळे जागतिक स्तरावर बाजारात मोठी खळबळ निर्माण झाली. याचा परिणाम भारतातही दिसून आला. Sensex 2,751 अंकांनी कोसळून 72,612.75 वर स्थिरावला, तर Nifty 914 अंकांनी घसरून 21,989.85 या पातळीवर पोहोचला.
‘हे’ शेअर घसरले-
या घसरणीत विशेषत: IT क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणावर पडले. SBI , TCS , Tata Motors यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स खोलवर घसरले. मात्र या संकटातही काही कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले. विशेष म्हणजे Siemens कंपनीच्या शेअरने तब्बल 20 टक्क्यांची उसळी घेतली. कंपनीने उर्जा क्षेत्रात विस्तार करत Siemens Energy India Limited नावाने नवीन कंपनी सुरु केली आहे. त्यामुळे जुने समभागधारक नवीन कंपनीचे समभागही मिळवणार आहेत. या घोषणेनंतर Siemens च्या शेअरने 2,490 रुपयांवरून उसळी घेत 2,998 रुपयांपर्यंत मजल मारली.

याशिवाय Delhivery या कंपनीच्या शेअरमध्ये 1.15 रुपयांची वाढ झाली असून त्याची किंमत 259.95 रुपये झाली आहे. तिसरी कंपनी म्हणजे Godrej Consumer Products Limited, जिच्या शेअरची किंमत 5 रुपयांनी वाढून 1,162 रुपये झाली आहे.
पैशांची घसरण-
दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयात 16 पैशांची घसरण झाली असून सध्या डॉलरचा विनिमय दर 85.63 रुपये आहे. या घसरणीमुळे देशाच्या आयात-निर्यात व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेमुळे जागतिक व्यापारात अस्थिरता निर्माण झाली असून, जागतिक मंदीचे सावट गडद होताना दिसत आहे. यामुळे Reserve Bank of India (RBI) काय भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.