शेअर बाजारात तेजी…कोणते शेअर्स कराल खरेदी? बघा गुंतवणूकदारांसाठी असलेला तज्ञांचा सल्ला

Published on -

Stock Investment Advice:- आज शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली आणि गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा उत्साह फुलवला. निफ्टीने २५,००० चा महत्त्वाचा टप्पा ओलांडत तब्बल १% ची उडी घेतली. मागील काही दिवसांपासून बाजारात घसरण सुरू होती, त्यामुळे आजची ही तेजी गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा ठरली. विशेषतः सरकारी बँकांनी व ऑटो क्षेत्रातील शेअरांनी चांगली कामगिरी करत बाजारात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.

आज निफ्टीमधील ५० पैकी ४४ स्टॉक्सनी हिरवा रंग दाखवत जोरदार वळण घेतले. सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये विशेष खरेदी दिसून आली. PSUs म्हणजेच पब्लिक सेक्टर बँकांच्या निर्देशांकात सुमारे १ टक्क्यांची वाढ झाली. रिअल इस्टेट आणि ऑटो क्षेत्रामध्येही मागील काही सत्रांनंतर आज पुन्हा तेजी पाहायला मिळाली. ऑटो स्टॉक्स सलग दुसऱ्या दिवशी वाढले, जे एक सकारात्मक संकेत मानला जातो.

सन टीव्हीच्या शेअर्समध्ये घसरण

मात्र, सर्वच स्टॉक्सनी आज बाजाराचा आनंद साजरा केला असे नाही. सन टीव्हीच्या शेअरने मात्र घसरणीचा सामना केला. कलानिधी मारन आणि दयानिधी मारन या दोन बंधूंमध्ये सुरु असलेल्या वादाचे पडसाद थेट शेअर बाजारात उमटले. दयानिधी मारन यांनी भाऊ कलानिधी यांच्यावर फसवणूक आणि मनी लॉन्डरिंगचे आरोप करत कायदेशीर नोटीस पाठवली. या वादामुळे सन टीव्हीचा शेअर ४ टक्क्यांहून अधिक घसरला.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही तज्ज्ञांनी विशिष्ट स्टॉक्सकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना वाटतं की या शेअर्समध्ये खरेदी करून चांगला नफा मिळवण्याची संधी आहे.

तज्ञांनी सुचवलेले शेअर्स

टाटा कंझ्युमर

ज्येष्ठ विश्लेषक प्रकाश गाबा यांनी टाटा कंझ्युमर या शेअरवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी सांगितले की, हा शेअर ११०८ रुपयांच्या स्टॉपलॉससह खरेदी करायला हवा. त्यांच्या मते, लवकरच हा शेअर १११० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर दुसऱ्या एका स्टॉकबाबत त्यांनी २६३ रुपयांचा स्टॉपलॉस आणि २७२ रुपयांचे टार्गेट दिले आहे.

एम अँड एम

आशिष बाहेती यांनी एम अँड एम या कंपनीच्या शेअरबाबत आशावाद व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, हा शेअर ३०५० रुपयांच्या स्टॉपलॉससह खरेदी केल्यास, पुढे ३१५० रुपयांचे उद्दिष्ट सहज गाठू शकतो.

अल्ट्राटेक सिमेंट

राजेश सातपुते यांनी अल्ट्राटेक सिमेंट या मोठ्या सिमेंट कंपनीकडे लक्ष वेधले आहे. त्यांचं म्हणणं आहे की, ११३५० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवून खरेदी केली तर पुढे ११५५० ते ११८०० रुपयांपर्यंत हा शेअर पोहोचू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!