Stock Split:- सध्या शेअर मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून भागधारकांसाठी बोनस शेअर्स, डिव्हिडंड तसेच स्टॉक स्प्लिट सारख्या महत्त्वाच्या घोषणा केल्या जात असून यामुळे भागधारकांना आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा मिळताना दिसून येत आहे. अगदी याच पद्धतीने सॅम्प्रे न्यूट्रिशन लिमिटेडने आपल्या भागधारकांसाठी एक आनंदाची बातमी दिली असून जर तुमच्याकडे या कंपनीचे शेअर असतील तर तुम्हाला दुहेरी फायदा मिळणार आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे ही कंपनी आता भागधारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटच्या माध्यमातून आर्थिक फायदा देणार आहे व त्या संबंधीची घोषणा देखील कंपनीने केलेली आहे.
सॅम्प्रे न्यूट्रिशन लिमिटेड कंपनी देणार बोनस शेअर्स
याबाबत सविस्तर वृत्त असे की,सॅम्प्रे न्यूट्रिशन लिमिटेड कंपनीने शेअर बाजाराला एक महत्त्वाची माहिती दिली व या माहितीमध्ये त्यांनी सांगितले की दहा रुपये दर्शनी मूल्याचा शेअर दोन भागांमध्ये आता स्प्लिट म्हणजेच विभागला जाणार आहे व या विभागणीनंतर कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य प्रति शेअर पाच रुपयांपर्यंत कमी होणार आहे. तसेच ही कंपनी आता भागधारकांना बोनस शेअर्स देखील देणार असून विशेष म्हणजे भागधारकांसाठी ही कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर्स देत आहे. परंतु अजून पर्यंत कंपनीने मात्र याकरता रेकॉर्ड डेट जारी केलेली नाही. परंतु पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये या संबंधीची प्रक्रिया पूर्ण होऊन बोनस शेअर्स दिले जातील अशी एक शक्यता आहे.

तीन महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट
सॅम्प्रे न्यूट्रिशन लिमिटेड या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर तेजीत असल्याचे पाहायला मिळाले व या शेअर्सला अप्पर सर्किट लागल्याचे दिसून आले. हा शेअर्स बीएसईवर 105.61 बंद झाला व गेल्या महिन्यात या शेअर्सने 54% परतावा दिला आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे तीन महिन्यात 252 टक्के व सहा महिन्यात 315 टक्क्यांचा दणदणीत परतावा भागधारकांना मिळाला आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात सॅम्प्रे न्यूट्रिशन लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किमतीत 838 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे.