Stock Split: अदानी ग्रुपची ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना दिवाळीपूर्वी देणार गिफ्ट! 5 वर्षात दिलेत 1505% रिटर्न…बघा अपडेट

Published on -

Stock Split:- गुंतवणूकदारांसाठी कंपन्यांच्या माध्यमातून देणार येणारा लाभांश तसेच बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट म्हणजेच एका शेअरचे करण्यात आलेले विभाजन इत्यादी माध्यमातून अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळत असते. अगदी याच प्रकारे अदानी ग्रुपची महत्वाची असलेली विविध क्षेत्रातील कंपनी अदानी पॉवर दिवाळीच्या आधी गुंतवणूकदारांना खूप मोठे गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. चला तर मग या लेखात आपण या संबंधी माहिती थोडक्यात बघू.

अदानी पॉवर करणार स्टॉक स्प्लिट

मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर अदानी ग्रुपची विविध क्षेत्रातील प्रसिद्ध असलेली कंपनी अदानी पावर आपल्या भागधारकांना दिवाळीच्या आधी एक मोठी भेट देणार असून या कंपनीने स्टॉक स्प्लिट म्हणजेच शेअरचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे व विशेष म्हणजे या कंपनीच्या बोर्डाने देखील या निर्णयाला ग्रीन सिग्नल दिला आहे व यामुळे आता प्रत्येक एक शेअर्स हा पाच शेअर्समध्ये विभागला जाणार आहे. याबद्दल माहिती देताना अदानी पॉवरने सांगितले की, कंपनी आता 1:5 रेशो मध्ये शेअरचे विभाजन करणार आहे. यानुसार आता प्रत्येक दहा रुपये व्हॅल्यू असलेला शेअर पाच भागात विभागला जाणार आहे व प्रत्येक विभागलेल्या शेअरची व्हॅल्यू दोन रुपये असणार आहे. महत्वाचे म्हणजे हा बदल केल्यानंतर मात्र गुंतवणूकदारांची जी काही या शेअर मधील होल्डिंग किंमत आहे ती तशीच राहणार आहे. भागधारकांकडे असलेल्या शेअरच्या संख्येत मात्र वाढ होणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. ही डेट सदस्यांच्या मंजुरीनंतर ठरवली जाईल अशी माहिती समोर आलेली आहे. अदानी पावर जेव्हा स्टॉकचे विभाजन करेल तेव्हा इक्विटी शेअर्स 2480 कोटींवरुन थेट बारा हजार चारशे कोटींपर्यंत वाढतील. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप 2 कोटी 32 लाख 843.40 इतके आहे.

स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमके काय?

या प्रक्रिया अंतर्गत कंपनी आपल्या एका शेअरचे छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन करते व बाजारामध्ये शेअर्स खरेदी विक्रीची प्रक्रिया यामुळे सोपे होण्यास मदत होते. तसेच शेअरची फेस व्हॅल्यू कमी होते व गुंतवणूकदारांनी रेकॉर्ड डेट पर्यंत शेअर होल्ड केला असल्यास नवे शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यामध्ये जमा होतात. महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेनंतर कंपनीच्या मार्केट कॅप मध्ये कुठलाही बदल होत नसतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe