दिवाळीनंतर ‘या’ स्टॉक मधून मिळणार जबरदस्त रिटर्न ! प्रभूदास लीलाधर यांच्या पसंतीचे टॉप 5 शेअर्स 

Published on -

Stock To Buy : दिवाळी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा असेल तर आजची बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा. टॉप ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधर यांच्याकडून दिवाळीच्या पार्श्ववभूमीवर काही शेअर्स सुचवण्यात आले आहेत. दिवाळीत बाजारात एक नवीन उत्साह राहील.

बाजारात मोठी उलाढाल होईल म्हणून मार्केट तेजीत असेल अन याच साऱ्या गोष्टी विचारात घेऊन काही स्टॉक सुचवण्यात आले आहेत. टॉप ब्रोकरेज कडून सुचवण्यात आलेल्या या स्टॉक मधून पुढील काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. 

हे स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल

V-Mart Retail – प्रभुदास लीलाधर ब्रोकरेज फर्मने हा शहर येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असे सांगितले आहे. या स्टॉक साठी ब्रोकरेज कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे.

हा स्टॉक 838 रुपयांच्या किमतीवर बाय करण्याचा सल्ला देण्यात आलाय. त्यासाठी एक हजार 30 ते 1130 रुपयांची टारगेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. सोबतच 730 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

HBL Engineering – या स्टॉक मध्ये थोडी घसरण दिसली आहे. पण आता याच्या किमतीला आधार मिळतोय. त्यामुळे हा स्टॉक 872 रुपयांवर बाय करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यासाठी अकराशे ते बाराशे रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आलीये. तसेच 780 रुपयांचा स्टॉप लॉस सुद्धा लावण्याचा सल्ला देण्यात आलाय.

स्विगी – गेल्या चार महिन्यांपासून या कंपनीच्या स्टॉक मध्ये घसरण सुरू आहे. येत्या काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याची शक्यता आहे. या स्टॉकने असेंडिंग चैनल तयार केला आहे.

यामुळे गुंतवणूकदारांनी हा स्टॉक 425 रुपयांच्या किमतीवर खरेदी करावा तसेच यासाठी 530 ते 580 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करावी असा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी 370 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News