Stock To Buy : दिवाळीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची आहे. ब्रोकरेज हाऊस एचडीएफसी सिक्युरिटीजने नुकतीच आपल्या पसंतीच्या शेअर्सची यादी दिली आहे. येत्या दिवाळीत या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास पुढील दिवाळीपर्यंत गुंतवणूकदारांना 24% पर्यंतचे रिटर्न मिळतील असा अंदाज आहे.
त्यामुळे जर तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही टॉप ब्रोकरेजने सांगितलेल्या या शेअर्सचा विचार करायला हरकत नाही. सध्या स्थितीला शेअर मार्केटमधील लिस्टेड कंपन्या सप्टेंबर तीमाईचे निकाल जाहीर करत आहेत.

सोबतच कंपन्यांकडून बोनस शेअर्स डिव्हिडंट अशा कॉर्पोरेट लाभाची देखील घोषणा होत आहे. यामुळे मार्केटमध्ये कमालीचा उत्साह आहे. दरम्यान आता आपण एचडीएफसी सेक्युरिटीजने सांगितलेल्या पाच शेअर्स बाबत माहिती पाहूयात.
12 महिन्यात मिळणार जबरदस्त रिटर्न
Northern ARC Capital – या स्टॉक साठी 333.5 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. हा स्टॉक 265 ते 277 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी 209.5 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. येत्या बारा महिन्यात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 23.5% रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.
Sheela Foam – या स्टॉक ची किंमत पुढील बारा महिन्यांमध्ये 837 रुपयांपर्यंत जाऊ शकते. अर्थात शेअरची किंमत करंट मार्केट प्राइस पेक्षा 23.5 टक्क्यांनी वाढणार असा अंदाज आहे. हा स्टॉक 678 ते 698 रुपयांच्या रेंजमध्ये बाय करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच यासाठी 539 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
Associated Alcohol and Breweries – या स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यास पुढील बारा महिन्यात 17 टक्के रिटर्न मिळतील. हा स्टॉक 1008 ते 1035 च्या रेंजमध्ये बाय करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी 1182 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. तसेच स्टॉक खरेदी करताना 807 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचाही सल्ला मिळाला आहे.
IDFC First Bank – बँकिंग सेक्टर साठी पुढील काळ फारच उत्साहवर्धक राहण्याची शक्यता आहे. यामुळे एचडीएफसी सेक्युरिटीज आयडीएफसीच्या शेअर साठी बुलिश आहे. हा शेअर पुढील बारा महिन्यांमध्ये 20 टक्के रिटर्न देईल असा अंदाज आहे. या स्टॉक साठी 88.5 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. हा स्टॉक 73 ते 75 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला मिळाला आहे.