Stock To Buy : मागील वर्ष शेअर बाजारासाठी विशेष निराशाजनक राहिले आहे आणि या वर्षाची सुरुवात देखील शेअर बाजारासाठी तशीच चढउताराने भरलेली आहे.
यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत कुठे गुंतवणूक करावी आणि कुठे गुंतवणूक करू नये याबाबत त्यांच्या मनात प्रश्नांचे वादळ उठले आहे. गेल्या वर्षी अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे पाण्यात गेले आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांचे फार नुकसान झाले आहे.

खरे तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी अनेकजण उत्सुक असतात मात्र कोणत्या शेअर्समधून चांगला प्रॉफिट मिळणार याबाबत त्यांच्या मनात संभ्रम अवस्था असते.
दरम्यान जर तुम्हालाही मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि या चढ उताराच्या काळात नेमक्या कोणत्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणे तुमच्या फायद्याचे ठरेल हे सुचत नसेल तर तुमच्यासाठी टॉप ब्रोकरेजने काही शेअर सुचवले आहेत ज्याची माहिती आज आपण या लेखातून घेणार आहोत.
आज आपण टॉप ब्रोकरेज ने सुचवलेल्या अशा चार शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत जे की गुंतवणूकदारांना कमाल 45 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतात.
हे शेअर गुंतवणूकदारांना बनवणार धनवान
प्रीमियर एनर्जीज : हा या यादीतला पहिला स्टॉक आहे आणि हा सर्वाधिक रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. नुवामा या ब्रोकरेज हाऊस ने सांगितल्याप्रमाणे हा स्टॉक येत्या काळात गुंतवणूकदारांना 45% पर्यंत रिटर्न देऊ शकतो.
या शेअरची करंट मार्केट प्राइस 751 आहे पण यासाठी 190 रुपयांची टारगेट प्राईस सेट करण्यात आली आहे. नक्कीच नव्या वर्षात तुम्ही नवीन शेअर्स घेणार असाल तर तुम्ही या शेअरचा विचार करू शकता.
तसेच जर आधीपासूनच तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये हा शेअर असेल तर तुम्ही ती गुंतवणूक कायम ठेवायला हवी कारण की येत्या काळात यामधून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
वारी एनर्जीज : नुवामाने या शेअर साठी सुद्धा बाय रेटिंग जारी केली आहे म्हणजेच शेअर खरेदीचा सल्ला दिलेला आहे. या स्टॉकची सध्याची किंमत 2673 रुपये एवढी आहे
मात्र येत्या काळात या स्टॉक ची किंमत 3691 रुपयांपर्यंत जाणार असा अंदाज आहे. म्हणजेच येत्या काळात या शेअर्स मधून गुंतवणूकदारांना 38% पर्यंत भरीव रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.
कल्याण ज्वेलर्स : ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे. या शेअर साठी बाय रेटिंग देतानाच ब्रोकरेज हाऊस ने 650 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.
सध्या या स्टॉक ची किंमत 521 रुपये एवढी आहे. म्हणजेच येत्या काळात या शेअरमधून गुंतवणूकदारांना 25% पर्यंत रिटर्न मिळू शकतात असे मोतीलाल ओसवाल ने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.
आदित्य बिर्ला कॅपिटल : सध्या हा स्टॉक 361 रुपयांवर व्यवहार करतोय. दरम्यान जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लेने या शेअर साठी बाय रेटिंग जाहीर केली आहे. अर्थात हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
यासाठी ब्रोकरेज फर्म कडून 427 रुपये एवढी टारगेट प्राईस सेट करण्यात आली आहे. म्हणजेच पुढील काही महिन्यांमध्ये यातून गुंतवणूकदारांना 18 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात.













