Share Market मधील गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! ‘या’ 4 कंपन्या देणार लाभांश

Stock To Buy : बुधवारी शेअर मार्केट बंद होते. पण तरीही शेअर मार्केटशी निगडित महत्त्वाच्या बातम्या सातत्याने बाहेर येत होत्या. शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्यांकडून सतत कॉर्पोरेट घोषणा सुरू होत्या. काल अनेक कंपन्यांनी लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे.

5 नोव्हेंबरला एकूण चार कंपन्यांनी लाभांश जाहीर केला आहे. याशिवाय काल आणखी तीन महत्त्वाच्या कंपन्यांनी आपल्या संचालक मंडळाच्या बैठका जाहीर केल्या आहेत जिथे लाभांश देण्याबाबत विचार होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान आता आपण काल कोणत्या चार कंपन्यांनी लाभांश देण्याची घोषणा केली आहे आणि यासाठीची रेकॉर्ड डेट काय आहे याविषयीची डिटेल माहिती या रिपोर्ट मधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेड – या कंपनीने नुकतेच तिमाही निकाल जाहीर केलेत. तसेच गुंतवणूकदारांना प्रति शेअर 0.05 रुपये लाभांश देण्याची घोषणाही केली.

यासाठीची रेकॉर्ड डेट 12 नोव्हेंबर फिक्स करण्यात आली आहे. अर्थात या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांचे नाव रेकॉर्ड बुक मध्ये राहील त्यांना याचा लाभ मिळणार आहे.

करिअर पॉइंट एज्युटेक – कंपनीने काल स्टॉक एक्स्चेंजला लाभांशबाबत माहिती दिली आहे. यात कंपनीने 12 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न होईल ज्यामध्ये बोर्ड लाभांश देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच याच बैठकीत कंपनीचे सप्टेंबर तिमाही निकाल समोर येतील.

सारेगामा इंडिया – कंपनीने आज तिमाही निकालांसह लाभांश जाहीर केला आहे. कंपनी तिच्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 4.5 रुपये लाभांश देणार आहे. यासाठी कंपनीने 11 नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट फायनल केली आहे.

अ‍ॅस्ट्रल – कंपनीने बुधवारी तिमाही निकाल जाहीर केले आहेत. निकालांसोबतच प्रति शेअर 1.5 रुपये लाभांश देखील जाहीर केला. यासाठीची रेकॉर्ड डेट 11 नोव्हेंबर फायनल करण्यात आली आहे.

डी-लिंक (इंडिया) लिमिटेड – कंपनीने बुधवारी त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सप्टेंबरचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

संचालक मंडळाने प्रति शेअर 6 रुपयांचा अंतरिम लाभांश देखील जाहीर केलाय. कंपनीने यासाठी 14 नोव्हेंबर ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून फायनल केली आहे.