Stock To Buy : येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा केला जाणार आहे. यामुळे सध्या सगळीकडे उत्साहाचे आणि अगदीच आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीत अनेक जण सोन्या-चांदी मध्ये गुंतवणूक करतो.
दिवाळीत सोने तसेच चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय अनेक जण दिवाळीच्या काळात कुठे ना कुठे इन्वेस्टमेंट करत असतात. या शुभकाळात इन्वेस्टमेंट केल्या चांगला लाभ मिळतो अशी धारणा आहे.

अशा स्थितीत जर तुम्ही ही यंदाच्या दिवाळी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की आज आपण शेअर मार्केट मधील अशा पाच स्टॉक ची माहिती पाहणार आहोत ज्यातून गुंतवणूकदारांना 25% पर्यंतचे रिटर्न मिळू शकतात.
खरंतर एसबीआय सिक्युरिटीजने असे 15 स्टॉक निवडले आहेत ज्यातून गुंतवणूकदारांना चांगली कमाई होऊ शकते. दरम्यान आज आपण याच पंधरापैकी पाच शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. जीएसटी सवलत, व्याजदर कपातीमुळे काही कंपन्यांचे शेअर्स येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याची शक्यता आहे.
हे पाच स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल
1)Oswal Pumps – हा शेअर्स येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देऊ शकतो. या शेअरची सीएमपी 750 रुपये आहे. पण यासाठी एसबीआय सिक्युरिटीजने 970 रुपयांची टार्गेट प्राईस सेट केली आहे. अर्थात हा शेअर येत्या काळात गुंतवणूकदारांना 25.2% पर्यंत रिटर्न देऊ शकतो.
2)स्वराज इंजिन्स – स्वराज इंजिनच्या स्टॉक साठी 5112 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात हा स्टॉक त्याच्या करंट मार्केट प्राइस पेक्षा 24.2 टक्क्यांनी वाढणार असा अंदाज आहे. नक्कीच येत्या काळात हा स्टॉक देखील आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर परतावा देताना दिसणार आहे.
3)अशोक लेलँड – हा शेअर्स सुद्धा येत्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता राखतो. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 138 रुपये आहे. पण या स्टॉकसाठी 170 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात येत्या काळात हा स्टॉक सुद्धा गुंतवणूकदारांना 23.2% पर्यंत रिटर्न देणार असा अंदाज आहे.
4)Azad Engineering- या कंपनीचे शेअर्स नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान आता एसबीआय सिक्युरिटीजने देखील या शेअर्सवर विश्वास दाखवलाय. टॉप ब्रोकरेजने या स्टॉक साठी 2105 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. अर्थात हा स्टॉक त्याच्या सीएमपी पेक्षा 22.5 टक्क्यांनी वाढवणारा असा अंदाज आहे.
5) Fiem Industries – या शेअर्समध्ये देखील येत्या काळात तेजी येणार आहे. एसबीआय सिक्युरिटीज ने यासाठी 2340 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. हा शेअर्स देखील येत्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 22.5% पर्यंतचे रिटर्न देऊ शकतो.