6 महिन्यातच पैसे झाले डबल ! ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवतोय मालामाल

Published on -

Stock To Buy : आतापर्यंत 2025 हे वर्ष शेअर मार्केटसाठी फारच आव्हानात्मक ठरले आहे. भूराजकीय तणावाचा शेअर मार्केटवर थेट प्रभाव पाहायला मिळालाय. सध्याची अस्थिर परिस्थिती गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलत आहे. आता अनेकजण सोने व चांदी मध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवत आहेत.

सप्टेंबर महिना देखील शेअर मार्केटसाठी फारच चढउताराने भरलेला राहिला आहे. पण, या महिन्यात काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांसाठी लकी ठरले आहेत. खरंतर तज्ञ शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म साठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.

पण काही असे स्टॉक आहेत ज्यांनी शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना चांगले जबरदस्त रिटर्न दिले आहेत. दरम्यान आज आपण अशाच एका स्टॉकची माहिती पाहणार आहोत.

नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरला आहे. या स्टॉकने सप्टेंबर महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 64% रिटर्न दिले आहेत.

तसेच मागील सहा महिन्यांमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत. महत्वाची बाब म्हणजे अजूनही हा स्टॉक फोकस मध्येच आहे. ऑगस्ट महिन्यात या कंपनीचे स्टॉक 2207.40 वर ट्रेड करत होते. पण काल या शेअर्सची किंमत 3750 रुपये राहिली. हा या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक ठरला.

या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या काही महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यामुळे या स्टॉकची गुंतवणूकदारांमध्ये चर्चा आहे. अनेकांनी हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड केला आहे. या स्टॉकने मागील तीन महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 97% रिटर्न दिलेत.

तसेच गेल्या सहा महिन्यांच्या काळात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 141% रिटर्न दिलेत. म्हणजे सहा महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत.

शॉर्ट टर्म मध्ये या स्टॉकची कामगिरी फारच उत्साहवर्धक राहिली आहे. मागील बारा महिन्यांचा विचार केला असता या स्टॉकने गुंतवणूकदारांना 45% रिटर्न दिलेत. तसेच दोन वर्षांच्या काळात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 340% रिटर्न दिले आहेत.

अर्थात लॉंग टर्म मध्ये देखील कंपनीचे स्टॉक गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले आहेत. शिवाय या कंपनीकडून आपल्या शेअर होल्डर्सला वेळोवेळी डिव्हीडंड सारखे लाभ सुद्धा दिले जात आहेत. या कंपनीचे मार्केट कॅपिटल 20,647 कोटी रुपये आहे.

विशेष बाब म्हणजे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दोनदा डिव्हिडेंड अर्थात लाभांशाचा लाभ दिला आहे. गेल्या वर्षी कंपनीने दोन रुपये प्रति शेअर इतका डिवीडेंट दिला होता. तसेच यावर्षी कंपनीकडून 2.50 डिव्हीडंट जाहीर करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe