Stock To Buy : सप्टेंबर महिना शेअर मार्केट साठी मोठा आव्हानात्मक राहिला. गेल्या महिन्यात मार्केट सातत्याने अपडाऊन होत राहिले. यामुळे गुंतवणूकदारांच्या पोटात सतत गोळा येत होता. दरम्यान आरबीआय ने या वर्षाच्या दुसऱ्या MPC अर्थातच पतधोरण बैठकीत रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेट यापुढेही 5.5% राहणार आहे.
खरे तर यावर्षी रेपो रेट मध्ये 100 बेसिस पॉईंटची अर्थात एक टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. रेपो रेट 6.5 वरून 5.5% झाला आहे. आरबीआयने यावेळी रेपो रेटमध्ये कोणताच बदल केलेला नसला तरी सुद्धा येत्या काळात पॉलिसी सपोर्टसाठी रेटमध्ये कपात करण्यात येऊ शकते असे संकेत मात्र दिले आहेत.

दरम्यान आता मॉनिटरी पॉलिसी कमेटीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे शेअर मार्केट मधील काही स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार अशी शक्यता आहे.
आज आपण आरबीआयच्या निर्णयामुळे कोणते पाच स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देऊ शकतात या संदर्भातील माहिती पाहणार आहोत. महत्त्वाची बाब म्हणजे आज आपण ज्या पाच स्टॉक ची माहिती पाहणार आहोत ते अवघ्या एका महिन्यातच आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतील असा अंदाज आहे.
SBI – शेअर मार्केट तज्ञ रियांक अरोडा यांनी पुन्हा एकदा स्टेट बँक ऑफ इंडिया वर विश्वास दाखवला आहे. त्यांनी या शेअर साठी बाय रेटिंग दिली आहे. या स्टॉक साठी 950 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आलीये. तसेच 850 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बजाज फायनान्स – आरबीआयच्या निर्णयाचा या वित्त कंपनीला सुद्धा फायदा होणार आहे. बजाज फायनान्स च्या शेअर्स मध्ये येत्या काळात मोठी वाढ होऊ शकते. रियांक अरोडा यांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक खरेदी करायचा असेल तर 950 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा. तसेच या स्टॉक साठी अरोडा यांनी 1100 रुपयांचे टार्गेट प्राईस दिले आहे.
कॅनरा बँक – येत्या काळात कॅनरा बँकेचा स्टॉक सुद्धा गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देणार आहे. शॉर्ट टर्म साठी हा स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतो. या शेअर साठी 134 रुपयांचे टार्गेट प्राईस देण्यात आले आहे. हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी 118 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा.
DLF – अलीकडेच या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली होती. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की या स्टॉक साठी 710 रुपयांवर एक चांगला सपोर्ट बनलेला आहे. येथून या स्टॉकच्या वाढीसाठी पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स पाहायला मिळतायेत. अर्थात येत्या काळात या स्टॉकच्या किमती वाढू शकतात. या स्टॉक मध्ये एक जोरदार पुलबॅक येऊ शकतो. यामुळे तज्ञांनी हा स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी 750 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे तर त्याचवेळी 699 वर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बँक ऑफ इंडिया – या सरकारी बँकेचा शेअर सुद्धा खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या स्टॉक साठी 136 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आलीये. त्याचवेळी या शेअरसाठी 119 वर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.