Stock To Buy : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन आहे का मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. टॉप ब्रोकरेज फॉर्म आनंद राठीने दिवाळीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. या शेअर्समधून येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळू शकतात असा ब्रोकरेजचा अंदाज आहे. पुढील बारा महिन्यात राठी यांनी सुचवलेल्या शेअर्समधून गुंतवणूकदारांना 29 टक्के रिटर्न मिळू शकतात.
अर्थात या दिवाळीला शेअरची खरेदी केल्यास गुंतवणूकदारांना पुढील दिवाळीपर्यंत 29 टक्क्यांचे भरीव रिटर्न हवे असतील तर गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. दरम्यान आता आपण आनंदराठी यांनी सुचवलेल्या स्टॉक्स बाबत माहिती पाहणार आहोत.

Shakti Pumps India Ltd – या शेअरचे करंट मार्केट प्राइस 810 रुपये आहे. पण यासाठी 1050 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना पुढील बारा महिन्यांमध्ये 29 टक्के रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. शासनाच्या पीएम कुसुम योजनेचा शक्ती पंप इंडिया लिमिटेड ला फायदा होण्याची शक्यता असल्याने ब्रोकरेजने हा अंदाज दिला आहे.
Tilaknagar Industries Ltd – या शेअरची करंट मार्केट प्राइस 453 रुपये आहे. परंतु यासाठी 580 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. अर्थात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना पुढील बारा महिन्यांच्या काळात 28 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात असा ब्रोकरेजचा अंदाज आहे. थोडक्यात ही ब्रँडी उत्पादक कंपनी पुढील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवते.
Fiem Industries Ltd – सध्या हा स्टॉक 1947 रुपयांवर व्यवहार करतोय. परंतु हा स्टॉक पुढील बारा महिन्यांमध्ये 2450 रुपयांपर्यंत वाढू शकतो. अर्थात यात गुंतवणूक करणाऱ्यांना येत्या एका वर्षात 26 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. नक्कीच दिवाळीत तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये नवीन शेअर्स ॲड करायचे असतील तर तुम्ही याचा विचार करू शकता.
BlackBuck Ltd – या कंपनीच्या शेअरची करंट मार्केट प्राईस 708 रुपये आहे. पण या स्टॉकसाठी पुढील बारा महिन्यांसाठी 860 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. अर्थात येत्या बारा महिन्यांमध्ये हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्क्यांचे रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो.