Stock To Buy : दिवाळीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुम्ही नक्कीच वाचायला हवी. आज आपण येत्या बारा महिन्यात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवणाऱ्या टॉप पाच शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत.
महत्त्वाची बाब म्हणजे आज आपण ज्या स्टॉक बाबत माहिती पाहणार आहोत त्यामधून गुंतवणूकदारांना 23 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात. ऍक्सीस डायरेक्टने 4 शेअर्स सुचवले आहेत जे की येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देऊ शकतात.

हे स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत
Rainbow Children’s Medicare Ltd. – या शेअरची करंट मार्केट प्राइस 1320 रुपये आहे. पण येत्या काळात हा स्टॉक 1620 रुपयांपर्यंत वाढू शकतो. अर्थात या स्टॉक मध्ये नजीकच्या भविष्यात 23 टक्क्यांपर्यंत वृद्धी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या स्टॉक साठी एक्सेस डायरेक्ट ने बाय रेटिंग जाहीर केली आहे.
DOMS Industries Ltd – या शेअरची करंट मार्केट प्राइस 2 हजार 556 रूपये आहे. मात्र जीएसटी मध्ये झालेली कपात या कंपनीसाठी फायद्याची ठरत आहे. जीएसटी कपातीच्या निर्णयामुळे भविष्यात या स्टॉकच्या किमती 22% पर्यंत वाढू शकतात असा अंदाज आहे. या स्टॉक साठी 3 हजार 110 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.
Minda Corporation Ltd – या शेअरच्या किमती येत्या काळात वाढू शकतात. आज याची करंट मार्केट प्राइस 582 रुपये आहे. यासाठी 690 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात नजीकच्या भविष्यात या शेअर्समधून गुंतवणूकदारांना 19% पर्यंत रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे.
केईसी इंटरनॅशनल – लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या शेअरचा विचार करायला काही हरकत नाही. याची करंट मार्केट प्राइस 855 रुपये आहे. पण यासाठी 1 हजार 30 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात भविष्यात या स्टॉकमधून गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात.