Stock To Buy : शेअर मार्केट गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये चढ उतार पाहायला मिळतं आहे. मार्केटमध्ये होणारी चर उतार गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय आहे.
दरम्यान या चढ उताराच्या काळात तुम्ही पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काही नवीन शेअर्स ॲड करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे.

शेअर बाजारातील आघाडीच्या ब्रोकरेज संस्थांनी गुंतवणूकदारांसाठी काही नवीन शेअर सुचवले आहेत. येत्या काळात रिअल इस्टेट, ऊर्जा, एफएमसीजी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील काही निवडक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देऊ शकतात असा अंदाज आहे.
येत्या काळात मार्केटमधील 4 निवडक शेअर गुंतवणूकदारांना 77% पर्यंत रिटर्न देण्याचे शक्यता आहे. मध्यम आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांकरिता हे शेअर्स फायद्याचे राहणार आहेत.
हे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल
व्हीआरएल लॉजिस्टिक्स : चढ उताराच्या काळात कोणत्या शेअर्स पोर्टफोलिओ मध्ये ऍड करावे याबाबत संभ्रमात असाल तर तुमच्यासाठी व्हीआरएल लॉजिस्टिक फायद्याचा ठरू शकतो. लॉजिस्टिक्स क्षेत्रातील महत्त्वाची असणारी ही कंपनी येत्या काळात चांगली कामगिरी करताना दिसेल.
म्हणून याच्या शेअर्सबाबत ब्रोकरेज संस्थांनी आशावादी भूमिका घेतली आहे. या शेअरची करंट मार्केट प्राइस 266 रुपये आहे मात्र यासाठी 350 रुपयांचे टारगेट प्राईस सेट करण्यात आले आहे.
अर्थात येत्या काळात यामधून गुंतवणूकदारांना 32 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात. कंपनीच मजबूत नेटवर्क, वाढती मागणी आणि कार्यक्षम ऑपरेशन्स यामुळे पुढील काळात याची कामगिरी सुधारण्याचा अंदाज आहे.
अदानी पॉवर : या यादीत अदानी पावरचा सुद्धा समावेश होतो. ऊर्जा क्षेत्रातील अदानी पॉवर या कंपनीवर अँटीक ब्रोकरेजने कव्हरेज सुरू करत बाय रेटिंग जाहीर केली आहे. खरे तर या कंपनीचे स्टॉक सध्या 143 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
पण यासाठी 187 रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात सुमारे 30 टक्के नफ्याची संधी पण दिसत आहे. वाढती वीज मागणी, सुधारलेले आर्थिक निकाल आणि विस्तार योजना यामुळे शेअरला पाठबळ मिळण्याची शक्यता आहे.
लोढा डेव्हलपर्स : रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे अर्थातच लोढा डेव्हलपर्सचे शेअर्स सुद्धा येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज संस्थेने कंपनीवर मोठा विश्वास दाखवला आहे.
सध्या 1063 रुपयांवर उपलब्ध असलेल्या या शेअरसाठी 1888 रुपयांचे टार्गेट प्राईस देण्यात आली असून यात तब्बल 77 टक्के वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मजबूत प्रकल्प पोर्टफोलिओ, विक्रीतील वाढ आणि शहरी भागातील घरांची वाढती मागणी हे प्रमुख सकारात्मक घटक मानले जात आहेत.
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स : एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या शेअरसाठीही टॉप ब्रोकरेज कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे. अर्थात हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या या शेअरची किंमत 1180 रुपये आहे. पण यासाठी 1450 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली असून येत्या काळात गुंतवणूकदारांना यातून 23% पर्यंत रिटर्न मिळू शकतात.