‘हे’ 4 शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! मिळणार 26 टक्क्यांपर्यंत रिटर्न, वाचा सविस्तर

Stock To Buy : तुम्ही पण नवीन शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत आहात का मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण येत्या काळात 26 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याची क्षमता ठेवणाऱ्या काही शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत.

ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने पुढील बारा महिन्यांसाठी काही शेअरची निवड केली आहे. त्यामुळे जर तुम्हीही बारा महिन्यांच्या कालावधीसाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हे शेअर्स फायद्याचे ठरणार आहेत.

खरंतर टॉप ब्रोकरेजने जे शेअर्स सुचवले आहेत आज आपण त्यापैकी चार शेअर्सची माहिती पाहणार आहोत जे की येत्या काळात 26 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतात.

हे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार लखपती

मॅरिको : एफएमसीजी क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरणार असा विश्वास व्यक्त होतोय. या कंपनीचा स्टॉक खरेदी करायचा असल्यास गुंतवणूकदारांनी 710 ते 740 रुपयांच्या रेंजमध्ये याची खरेदी करायला हवी. तसेच यासाठी 880 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करायला हवी. अर्थात येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 19 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

सन फार्मा : फार्मा क्षेत्रातील ही आघाडीची कंपनी पुढील बारा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवते. Sun Pharma चे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे स्टॉक 1750 ते 1790 रुपयांच्या रेंजमध्ये बाय करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच यासाठी ब्रोकरेज कडून 2180 रुपयांची टारगेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात पुढील बारा महिन्यांच्या काळात हे शेअर्स 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात असा अंदाज आहे.

बँक ऑफ इंडिया : बँकिंग सेक्टर 2025 मध्ये देखील शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले आहे आणि 2026 मध्ये देखील बँकिंग सेक्टर साठी सुवर्णकाळ राहील असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त केला जातोय. यामुळे आता आयसीआयसीआय सिक्युरिटीजने Bank of India चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक 132 ते 140 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज कडून देण्यात आला असून यासाठी 180 रुपयांची टारगेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 25.9% पर्यंत रिटर्न मिळू शकतात. नक्कीच नव्याने शेअर्स खरेदी करायचे असतील तर बँकिंग सेक्टर मधील हा शेअर्स गुंतवणूकदारांचे नशीब चेंज करणारा ठरू शकतो.

अल्ट्राटेक सिमेंट : सिमेंट क्षेत्रात या कंपनीचे वर्चस्व पाहायला मिळते. दरम्यान आता ही कंपनी येत्या बारा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटन देऊ शकते. हा स्टॉक खरेदी करायचा असल्यास 11,200 ते 11 हजार 700 रुपयांच्या रेंजमध्ये हा स्टॉक खरेदी केला जाऊ शकतो. यासाठी ब्रोकरेज कडून 14,500 रुपयांची टारगेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात येत्या 12 महिन्यात गुंतवणूकदारांना या शेअर्समधून 26% रिटर्न मिळतील अशी आशा आहे.