Stock To Buy : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी बोनस शेअर्स तसेच लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. पुढील आठवड्यात अनेक कंपन्या बोर्ड बैठका घेणार आहेत.
बहुतेक कंपन्या त्यांचे तिमाही निकाल जाहीर करणार आहेत. काही कंपन्या निकालांसोबत लाभांश आणि स्टॉक स्प्लिट देखील जाहीर करणार अशी शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काही कंपन्या बोनस शेअर सुद्धा देणार आहेत.

दरम्यान जर तुम्हालाही डिव्हीडंट देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पुढचा आठवडा तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. पुढील आठवड्यात एक-दोन नाही तर तब्बल 5 कंपन्या डिव्हिडन्ड देणार आहेत.
यामुळे शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी उपलब्ध होईल अशी आशा आहे. दरम्यान आता आपण येत्या आठवड्यात कोणत्या कंपन्या डिव्हिडंट देणार? याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्रिकॉल – Pricol ची बोर्ड बैठक 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दिवशी कंपनी सप्टेंबर तिमाही निकाल सादर करणार आहेत. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाकडून अंतरिम लाभांशावर निर्णय घेतला जाऊ शकतो.
Symphony – सिम्फनीची बोर्ड मिटिंग 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या बोर्ड मीटिंगमध्ये ही कंपनी सुद्धा तिमाही निकाल सादर करणार आहे. यात अंतरिम लाभांशावर निर्णय घेतला जाऊ शकतो.
बेयर क्रॉपसायन्स – ही कंपनी सुद्धा आपल्या शेअर होल्डर्सला लाभांशी देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सात नोव्हेंबरला होणार आहे आणि यामध्ये लाभांशी देण्याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो.
डी-लिंक (इंडिया) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – ही कंपनी पुढील आठवड्यात अंतरिम लाभांशाचा निर्णय घेऊ शकते आणि त्याचबरोबर त्यांचे निकाल 5 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.
गुजरात पिपावाव पोर्ट – या कंपनीची बोर्ड मिटिंग 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यात निकाल सादर केले जातील आणि अंतरिम लाभांशाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
ऑटो कंपोनंट कंपनी अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी – या कंपनीची बोर्ड मिटिंग 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. निकाल त्याच दिवशी सादर केले जातील. कंपनी अंतरिम लाभांशाची सुद्धा घोषणा करू शकते.













