‘हे’ 5 शेअर्स गुंतवणूकदारांना देणार 31 टक्क्यांपर्यंत रिटर्न ! 12 महिन्यातच गुंतवणूकदार होणार श्रीमंत 

Published on -

Stock To Buy : शेअर मार्केट मधील अस्थिरता गुंतवणूकदारांची चिंता वाढवत आहे. पण शेअर मार्केटमध्ये असेही काही स्टॉक आहेत जे की गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून देत आहेत. अशा स्थितीत जर तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.

कारण की आज आपण पुढील बारा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवणाऱ्या काही स्टॉक्स बाबत माहिती पाहणार आहोत. Centrum Broking या ब्रोकरेज फर्मने सुचवलेल्या पाच शेअर्स बाबत आज आपण येथे माहिती पाहणार आहोत.

महत्वाची बाब म्हणजे या ब्रोकरेज ने जे पाच शेअर सांगितले आहेत त्यातून गुंतवणूकदारांना येत्या काळात 31 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात. फक्त बारा महिन्यांच्या काळात हे शेअर आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवतात. 

हे स्टॉक गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त परतावा 

Azad Engineering – हा स्टॉक 1640 रुपयांच्या किमतीत खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 31 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतो. या स्टॉक साठी 2,145 रुपयांची टारगेट प्राईस सेट करण्यात आली आहे. कंपनीकडे 6000 कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे आणि ही एक जमेची बाजू आहे. 

Dixon Technologies – या कंपनीचे स्टॉक 17,195 रुपयांच्या किमतीवर खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे याचे स्टॉक 21,574 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. अर्थात पुढील बारा महिन्यांच्या काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांपर्यंत रिटर्न देईल असा अंदाज आहे. 

Syrma SGS Technology – हा स्टॉक देखील पुढील बारा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना 25% रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. हा शेअर 830 रुपयांच्या किमतीवर खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली असून यासाठी 1 हजार 35 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. 

चोलामंडलम इन्वेस्टमेंट – बँकिंग सेक्टर मध्ये पुढील काळात मोठा बूम येणार आहे. यामुळे ब्रोकरेज या स्टॉक साठी बुलिश आहेत. हा स्टॉक पुढील बारा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना 18% रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. 1647 रुपयांच्या किमतीत हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच यासाठी 1935 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे.

Canara Bank – हा स्टॉक सध्या 128 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय पण येत्या काळात याची किंमत 151 रुपयांचा टप्पा गाठणार असा अंदाज आहे. थोडक्यात यातूनही गुंतवणूकदारांना 18 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News