Stock To Buy : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे. टॉप ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सने भारताच्या एरोस्पेस आणि डिफेन्स सेक्टरच्या आठ कंपन्यांचा रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्ट मध्ये पाच डिफेन्स शेअर्सला बाय रेटिंग देण्यात आली आहे.
महत्त्वाचे बाब म्हणजे या डिफेन्स शेअर्समधून गुंतवणूकदारांना 12 टक्क्यांपासून 58% पर्यंतचे रिटर्न मिळू शकतात असेही या अहवालात सांगितले गेले आहे. अशा स्थितीत आज आपण ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सने कोणते 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

तसेच या शेअर्स साठी देण्यात आलेली टार्गेट प्राईस किती आहे, या शेअर्समधून गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळू शकतात याचा अंदाज सुद्धा आता आपण जाणून घेणार आहोत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स – हा स्टॉक येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देऊ शकतो. यासाठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. भारत इलेक्ट्रॉनिकच्या शेअर्ससाठी 455 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. या स्टॉक मधून येत्या काळात 12 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे जर तुमच्याही पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक असेल तर तुम्ही नक्कीच स्टॉक होल्ड करून ठेवायला हवा.
आझाद इंजीनियरिंग – या स्टॉक साठी 2055 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. याला ब्रोकरेजने बाय रेटिंग दिली असून येत्या काळात गुंतवणूकदारांना यातून 28% पर्यंत रिटर्न मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक असेल तर तुम्हाला येत्या काळात चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे.
डेटा पॅटर्न – या स्टॉक साठी 3640 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. या शेअर साठी ब्रोकरेज कडून बाय रेटिंग मिळाली आहे. अर्थात स्टॉक खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. यातून येत्या काळात 38 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळतील असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.
एक्स्ट्रा मायक्रोवेव – टॉप ब्रोकरेज कडून या शेअर्ससाठी बाय रेटिंग मिळाली आहे. यासाठी 1455 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. यातून गुंतवणूकदारांना 45% पर्यंतचे रिटर्न मिळू शकतात असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
PTC इंडस्ट्रीज – या स्टॉकला देखील बाय रेटिंग देण्यात आली आहे. या स्टॉक साठी 24,725 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. त्यातून गुंतवणूकदारांना येत्या काळात 58% रिटर्न मिळतील असा अंदाज आहे.