ॲक्सिस कॅपिटलच्या पसंतीचे ‘हे’ 6 शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! 

Published on -

Stock To Buy : शेअर मार्केटमध्ये कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देतील आणि कोणत्या शेअर्स मधून गुंतवणूकदारांना नुकसान हे सांगणे कठीणच आहे. पण तरीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना कंपनीच्या बेसिक फंडामेंटल बाबत माहिती जाणून घेऊनच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

ज्या कंपनीचे फंडामेंटल स्ट्राँग असतात अशाच कंपनीमध्ये गुंतवणूक करायला हवी. ज्या कंपन्यांवर कर्ज नसते किंवा नगरने कर्ज असते अशा कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरतात. दरम्यान जर तुम्हालाही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काही नवीन शेअर्स ॲड करायचे असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी खास करणार आहे.

आज आपण टॉप ब्रोकरेज ॲक्सेस कॅपिटलने सुचवलेल्या 6 शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. ब्रोकरेजने दिवाळी टॉप पिक्स लिस्ट जारी केली आहे ज्यामध्ये एकूण नऊ शेअर्स आहेत. आज आपण यातील सहा शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. ब्रोकरेजने असा दावा केला आहे की हे स्टॉक येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवतात.

विशेषता ज्यांना पुढील बारा महिन्यांमध्ये शेअर मार्केट मधून चांगले रिटर्न हवे असतील त्यांच्यासाठी हे स्टॉक फायद्याचे ठरणार आहेत. कारण की टॉप ब्रोकरेजने या शेअर्समधून येत्या 12 महिन्यात चांगली कमाई होऊ शकते असा अंदाज दिला आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात या स्टॉकबाबत डिटेल माहिती.

हे स्टॉक गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न  

JSW Energy – या स्टॉक साठी टॉप ब्रोकरेज बुलिश आहेत. ब्रोकरेज कडून या शेअर साठी 625 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात येत्या बारा महिन्यात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 15% पर्यंतचे रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे.

Caforge – या कंपनीने काही जागतिक कंपन्यांसोबत काही लॉन्ग टर्म कॉन्ट्रॅक्ट साइन केले आहेत आणि यामुळे ॲक्सेस कॅपिटल या स्टॉकवर बुलिश आहे. ब्रोकरेजने यासाठी 1980 रुपयांचे टारगेट प्राईस सेट केले आहे. अर्थात हा स्टॉक देखील गुंतवणूकदारांना पुढील बारा महिन्यांमध्ये पंधरा टक्के रिटर्न देऊ शकतो.

Federal Bank – ॲक्सिस कॅपिटलने या स्टॉक साठी 240 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येत्या बारा महिन्याच्या स्टॉक मधून 15% पर्यंत ची कमाई होऊ शकते.

Kotak Mahindra Bank – हा बँकिंग स्टॉक सुद्धा पुढील बारा महिन्यात गुंतवणूकदारांना 16% रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. यासाठी ॲक्सिस कॅपिटल ने 2500 रुपयांचे टारगेट प्राईस निश्चित केले आहे.

Chalet Hotels – या शेअर्स साठी 1120 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. पुढील बारा महिन्यात यातून गुंतवणूकदारांना 17 टक्के रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

Minda Corp – येत्या बारा महिन्यात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 19% पर्यंत रिटर्न मिळू शकतात. याला गुंतवणूकदारांनी बाय रेटिंग दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe