Stock To Buy : गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे आणि यामुळे गुंतवणूकदार साहजिकच चिंतेत आहेत. त्यामुळे कोणते स्टॉक या काळात चांगले रिटर्न देतील असा सवाल उपस्थित होतो.
खरे तर, गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये चढ-उतार सुरू असली तरी देखील काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत आणि येत्या काळात सुद्धा असे काही स्टॉक आहे जे आपल्या गुंतवणूकदारांची चांदी करतील असा विश्वास व्यक्त केला जातोय.

दरम्यान आज आपण अशा दोन प्रमुख स्टॉकची माहिती पाहणार आहोत जे येत्या काळात 24% पर्यंत रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात. तीन टॉप ब्रोकरेजकडून शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी असे तीन स्टॉक सुकवण्यात आले आहेत जे आगामी काळात चांगले रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात.
अशा परिस्थितीत, आज आपण टॉप ब्रोकरेजकडून सुचवण्यात आलेल्या या तीन स्टॉकची आणि त्यासाठी जारी करण्यात आलेल्या टार्गेट प्राईसची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
‘हे’ शेअर्स गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न
इंटरग्लोब ऍविएशन : शेअर मार्केट चढ उताराच्या काळात इंटर ग्लोब एवीएशनचा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. Elara या टॉप ब्रोकरेजने या शेअर साठी बाय रेटिंग जाहीर केली आहे.
अर्थात ब्रोकरेज कडून हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र या स्टॉक साठीची टारगेट प्राईज कडून कमी करण्यात आली आहे. आधी या शेअर्ससाठी टार्गेट प्राईस 7,241 रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती.
पण आता या शेअर साठी सहा हजार वीस रुपये एवढी टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. या शेअरच्या करंट मार्केट प्राइस पेक्षा ही किंमत अजूनही 24% आहे म्हणजेच येत्या काळात या शेअर्समधून गुंतवणूकदारांना 24% पर्यंतचे रिटर्न मिळतील असा अंदाज ब्रोकरेज कडून कायम ठेवण्यात आला आहे.
सिमेन्स : ब्रोकरेज फर्म Citi ने शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी Siemens हा स्टॉक सुचवला आहे. ब्रोकरेजकडून या शेअर साठी न्यूट्रल रेटिंग कायम ठेवण्यात आली आहे. तसेच ब्रोकरेज कडून या शेअर साठी 3350 रुपये एवढी टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.
आधी ब्रोकरेज कडून या शेअर साठी 3425 रुपये एवढी टार्गेट प्राईस ठरवण्यात आली होती. मात्र आता ही टार्गेट प्राईज ब्रोकरेजने कमी केली आहे. पण तरीही हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा अधिकचा रिटर्न देईल असा अंदाज आहे.













