शेअर मार्केट गुंतवणूकदारांना ‘या’ टॉप 3 शेअर्समधून मिळणार जबरदस्त रिटर्न !

Published on -

Stock To Buy : शेअर मार्केटमध्ये केली जाणारी गुंतवणुक ही जोखीमीची असते. काही वेळा मार्केटमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न देऊ शकते.

यामुळे मार्केटमध्ये गुंतवणूक करताना योग्य अभ्यास करणे आवश्यक असते. कोणत्याही शेअर्स गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करण्याआधी त्या शेअरच्या किमती ऐवजी त्या संबंधित कंपनीची प्रोफाइल म्हणजेच कंपनीचा व्यवसाय नेमका कसा आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे.

खरे तर 2025 हे वर्ष मार्केट साठी फारच निराशाजनक राहिले आहे, मागील वर्षी गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. यामुळे आता 2026 हे वर्ष शेअर मार्केटसाठी कसे ठरते हे पाहण्यासारखे राहणार आहे.

दरम्यान, जर तुम्हाला यावर्षी तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काही नवीन शेअर्स ॲड करायचे असतील तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण टॉप ब्रोकरेंज कडून सुचवण्यात आलेल्या तीन शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत.

कजारिया सिरामिक्स : ही कंपनी बांधकाम क्षेत्राशी निगडित आहे. कंपनी टाइल्स आणि सिरामिक्सचा व्यवसाय करत असून या कंपनीसाठी टॉप ब्रोकरेज ने बाय रेटिंग जाहीर केली आहे.

एलारा सिक्युरिटीजने या शेअर्समध्ये गुंतवणुकीची शिफारस केली असून या शेअरची करंट मार्केट प्राईस 1003 रुपये इतकी आहे. पण यासाठी 1380 रुपयांची टारगेट प्राईस ठरवण्यात आली आहे.

अर्थात या शेअर्स मधून गुंतवणूकदारांना येत्या काळात 37 ते 38 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतील असा अंदाज देण्यात आला आहे.

देवयानी इंटरनॅशनल : नुवामाने हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज कडून 138 रुपयांच्या रेंजमध्ये हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली असून येत्या काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना 52% पर्यंत रिटर्न देऊ शकतो असा अंदाज देण्यात आला आहे.

या स्टॉक साठी 211 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच हा शेअर येत्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार आहे.

सेंचुरी प्लायबोर्ड्स : बिल्डिंग मटेरियल क्षेत्रात Century Plyboards एक मोठी कंपनी बनत चालली आहे. दरम्यान तुम्हाला बिल्डिंग मटेरियल क्षेत्रातील कंपनीत इन्व्हेस्ट करायची असेल तर हा स्टॉक तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.

कारण एलारा सिक्युरिटीजने हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 815 रुपये इतकी आहे मात्र लवकरच हा स्टॉक 980 रुपयांपर्यंत वाढणार असा अंदाज आहे.

म्हणजेच येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतील असा दावा करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News