‘या’ सोलर कंपनीचा स्टॉक 140 रुपयांवर जाणार ! भारतीय रेल्वेकडून रूफटॉप सोलर प्रोजेक्टसाठी मिळाली मोठी ऑर्डर

Published on -

Stock To Buy : शेअर मार्केट मध्ये लिस्ट असणाऱ्या एका सोलर कंपनीला भारतीय रेल्वे कडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. यामुळे या सोलर कंपनीचा स्टॉक गेल्या काही दिवसांपासून फोकस मध्ये आहे.

ही भारतामधील एक प्रमुख सोलर सोल्युशन्स उत्पादक कंपनी आहे. सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम लिमिटेड या कंपनीला भारतीय रेल्वे कडून ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

खरंतर या सोलर कंपनीला उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागाकडून 3 मेगावॉट क्षमतेचा ग्रिड-कनेक्टेड रूफटॉप सोलर प्रकल्पाची एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.

ही ऑर्डर सुमारे 13 कोटी रुपयांची असल्याची माहिती समोर आलीये. यामुळे येत्या काळात या कंपनीचा स्टॉक पुन्हा एकदा तेजीत येण्याची शक्यता आहे. कंपनीने या ऑर्डरची डिटेल माहिती देखील दिली आहे.

कंपनीने सांगितल्याप्रमाणे भारतीय रेल्वे सोबत झालेला हा करार हरित ऊर्जा क्षेत्राला नवीन दिशा देणार आहे. तसेच ही मोठी डील कंपनीची हरित ऊर्जा क्षेत्रातील भूमिका अधोरेखित करत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

या ऑर्डर प्रमाणे कंपनीला डिझाइन, बांधकाम, पुरवठा, स्थापना, चाचणी व कमिशनिंगपर्यंतची संपूर्ण जबाबदारी पार पाडायची आहे. या अंतर्गत कंपनीकडून  विविध क्षमतेचे सौर पॅनेल्स आग्रा विभागात बसवले जाणार आहेत.

भारतीय रेल्वेच्या सस्टेनेबिलिटी व हरित ऊर्जा धोरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा राहणार आहे. हा प्रकल्प प्रदूषण कमी करणारा ठरेल. तसेच या प्रकल्पामुळे सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम लिमिटेडच्या विस्ताराला चालना मिळू शकणार आहे.

दरम्यान ही ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर टॉप ब्रोकरेजने या स्टॉकच्या किमतीत लवकरच मोठी वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. सध्या हा स्टॉक 125 च्या रेंजमध्ये व्यवहार करतोय.

गेल्या काही आठवड्यांपासून या शेअरचा व्यवहार एका निश्चित रेंजमध्ये होतोय. आज बुधवारी या स्टॉकची किंमत 125 रुपये झाली होती. दरम्यान मोतीलाल ओसवाल या टॉप ब्रोकरेजने शॉर्ट टर्ममध्ये हा शेअर रेंजबाउंड राहील असा अंदाज दिलाय.

ब्रोकरेज कडून हा शेअर 140 रुपयांवर पोहोचेल असे सांगितले जात आहे. अर्थात येत्या काळात ही कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला चांगला परतावा देताना दिसेल असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe