Stock To Buy : दिवाळीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आज आपण मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेल्या काही शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. खरे तर दिवाळीत दरवर्षी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.
सरकारने घेतलेल्या काही धोरणात्मक निर्णयामुळे येत्या काळात शेअर मार्केटमध्ये मोठा बूम येणार अशी शक्यता आहे. रेपो दरात 1 टक्क्यांची कपात, तरलता वाढवणे आणि जीएसटी 2.0 सारख्या सुधारणांमुळे शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येण्याची शक्यता आहे.

दरम्यान जर तुम्हाला या दिवाळीत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुमच्यासाठी मोतीलाल उस वाल्यांनी सुचवलेल्या काही शेअर्स बाबत आज आम्ही माहिती घेऊन आलो आहोत. या शेअर्समधून येत्या काळात गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार या संदर्भात मोतीलाल ओसवाल यांचा अहवाल काय सांगतो हेच आज आपण या लेखातून समजून घेणार आहोत.
मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेले शेअर्स
भारत इलेक्ट्रॉनिक्स – या स्टॉकच्या किमती येत्या काळात 22% पर्यंत वाढू शकतात असा मोतीलाल ओसवाल फर्मचा अंदाज आहे. या शेअर साठी 490 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. कंपनीची ऑर्डर बुक एक ट्रिलियन पेक्षा जास्त झाली आहे यामुळे ब्रोकरेज या शेअर्ससाठी मोठे सकारात्मक आहेत.
स्विगी – येत्या काळात या शेअर्सच्या किमतीत 25 टक्क्यांपर्यंतची वाढ होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या स्टॉक साठी 550 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. दिवाळीत तुमचा पोर्टफोलिओ सजवायचा असेल तर तुम्ही या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता.
इंडियन हॉटेल्स – या शेअर्समध्ये पुढील बारा महिन्यांच्या काळात 21 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. या स्टॉक साठी 880 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे.
मॅक्स फायनानशियल सर्व्हिसेस – या कंपनीच्या शेअर्समध्ये येत्या काळात 24 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. यासाठी ब्रोकरेज फर्मकडून दोन हजार रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे.