Super Stocks: बाजारात बंपर रिटर्न मिळवण्यासाठी 5 सर्वात्तम स्टॉक्स! 15 दिवसात काय होईल?

अर्थसंकल्पानंतर गुंतवणूकदारांची काही शेअर्समध्ये चांगली कमाई होऊ शकते. सरकारने नवीन करप्रणालीअंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:

Stocks For Today:- अर्थसंकल्पानंतर गुंतवणूकदारांची काही शेअर्समध्ये चांगली कमाई होऊ शकते. सरकारने नवीन करप्रणालीअंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. ब्रोकरेज हाऊस अ‍ॅक्सिस डायरेक्टने याचा फायदा घेण्यासाठी ५ शेअर्स निवडले आहेत.जे पुढील १५ दिवसांत चांगला परतावा देऊ शकतात.

गुंतवणुकीसाठी फायदेशीर स्टॉक्स

केआरएन हीट

पहिला शेअर केआरएन हीट एक्सचेंजर आहे. सध्या हा शेअर 863.1 रुपयांवर उपलब्ध असून अ‍ॅक्सिस डायरेक्टने त्याचे टार्गेट प्राईस 955 रुपये ठेवले आहे.

गुंतवणूकदारांनी हा शेअर 835 ते 855 रुपयांच्या दरम्यान खरेदी करावा आणि 810 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवावा. हा शेअर उष्णता व्यवस्थापन आणि औद्योगिक उपकरण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्याच्या वाढीची संधी मोठी आहे.

गोदरेज इंडस्ट्रीज

गोदरेज इंडस्ट्रीज हा दुसरा महत्त्वाचा शेअर आहे. ज्याला अ‍ॅक्सिस डायरेक्टने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर सध्या 920.6 रुपयांवर आहे आणि 993 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

गुंतवणूकदारांनी 897 ते 906 रुपयांच्या दरम्यान खरेदी करावा आणि 877 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवावा. गोदरेज इंडस्ट्रीज विविध व्यवसायांमध्ये गुंतलेले असून त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होऊ शकतो.

इक्विनॉक्स इंडिया

इक्विनॉक्स इंडिया हा तिसरा शेअर आहे, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो. सध्या या शेअरची किंमत 147.07 रुपये असून 169 रुपये लक्ष्य ठेवले आहे.

प्रवेश किंमत 149 ते 151 रुपये ठेवावी आणि 145 रुपयांवर स्टॉप लॉस लावावा. हा शेअर निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प क्षेत्रात कार्यरत असून रिअल इस्टेट क्षेत्राच्या वाढीचा फायदा याला मिळू शकतो.

स्विगी

स्विगी हा चौथा शेअर आहे.जी ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी आहे. सध्या या शेअरची किंमत 435.45 रुपये असून त्याचे लक्ष्य 489 रुपये ठेवले आहे.

गुंतवणूकदारांनी 428 ते 432 रुपयांच्या दरम्यान खरेदी करावे आणि 413 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवावा. ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या मागणीमुळे या शेअरमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

सिम्फनी शेअर

शेवटचा शेअर म्हणजे सिम्फनी हा घरगुती उपकरण क्षेत्रातील शेअर आहे. सध्या या शेअरची किंमत 1328.75 रुपये असून त्याचे लक्ष्य 1443 रुपये ठेवले आहे.

गुंतवणूकदारांनी 1289 ते 1302 रुपयांच्या दरम्यान खरेदी करावी आणि 1255 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवावा. एअर कूलर आणि इतर उपकरणांच्या मागणीमुळे या कंपनीला चांगला फायदा होऊ शकतो.

या पाच शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास पुढील 15 दिवसांत चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शेअर बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन गुंतवणुकीपूर्वी योग्य सल्लागाराचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe